शिक्षिकेने केली शिक्षण विभागाची फसवणूक
By admin | Published: May 30, 2014 12:17 AM2014-05-30T00:17:34+5:302014-05-30T00:17:34+5:30
एका खासगी शाळेतील शिक्षिकेने सेवापुस्तिकेवर खोडतोड करीत जन्मतारीख वाढवून शासनाची दिशाभूल केल्याचा अहवाल चौकशी अधिकारी गटशिक्षणाधिकारी देशमुख यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे सादर केला आहे.
सेवापुस्तिकेवर केली खोडतोड : जन्मतारखेत केला बदल
वर्धा : एका खासगी शाळेतील शिक्षिकेने सेवापुस्तिकेवर खोडतोड करीत जन्मतारीख वाढवून शासनाची दिशाभूल केल्याचा अहवाल चौकशी अधिकारी गटशिक्षणाधिकारी देशमुख यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे सादर केला आहे. सदर शिक्षिकेने या माध्यमातून दोन शासनाची फसवणूक केल्याचा ठपका अहवाल ठेवण्यात आला.
आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील श्री सदगुरू विद्यामंदिरात कार्यरत असलेली शिक्षिका मुक्ता शंकर हरगे यांनी त्यांची जन्मतारीख वाढविल्याची तक्रार मनोहर पाटील यांच्यातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालयात करण्यात आली. तिथून ती तक्रार शिक्षणाधिकारी कार्यालयात आली. शिक्षणाधिकार्यांनी चौकशी करण्याची जबाबदारी आर्वीचे गटशिक्षणाधिकारी एस. देशमुख यांना दिली. त्यांच्या चौकशीत या शिक्षिकेची जन्मतारीख बदलविल्याचे समोर आले. त्यांची मुळ जन्मतारीख १५ मे १९५३ अशी असून ती १५ मे १९५५ अशी केल्याचे समोर येत आहे. शिवाय ज्या शाळेत शिक्षणच घेतले नाही त्या शाळेतून त्यांनी पहिली ते चवथी पर्यंतचा दाखल आणल्याचे समोर आले आहे.(प्रतिनिधी)