विज्ञानस्रेही विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:23 PM2018-01-14T23:23:56+5:302018-01-14T23:24:08+5:30
येथील न.प. माध्यमिक शाळेच्या पटांगणात आयोजित तीन दिवसीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनीत उत्कृष्ट प्रतिकृतींची निवड करून गुणानुक्रमे पारितोषिके दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : येथील न.प. माध्यमिक शाळेच्या पटांगणात आयोजित तीन दिवसीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनीत उत्कृष्ट प्रतिकृतींची निवड करून गुणानुक्रमे पारितोषिके दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.च्या शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट यांची उपस्थिती होती. अतिथी म्हणून न.प. गटनेता शोभा तडस, प्रा. नरेंद्र मदनकर, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, गटशिक्षणाधिकारी सतिश आतराम, न.प. सदस्य राजश्री देशमुख, अश्विनी काकडे, संगीता कामडी, सुनिता बकाणे, सुनिता ताडाम, पं.स. सदस्य कल्याणी ढोक यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्राथमिक माध्यमिक व शिक्षक प्रतिकृतींना व अतिथींच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली. यामध्ये प्राथमिक विभागातील प्रथम क्रमांक कुमकुम इंगोले, मॅडमवार हायस्कूल टाकळी यांनी मिळविला. द्वितीय विद्या मोहोड, कृष्णा तायल हायस्कूल पुलगाव, तृतीय आयुष मोहोड, न.प. माध्यमिक शाळा देवळी, माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक सृष्टी खैरकार, मॅडमवार हायस्कूल टाकळी दरणे, द्वितीय कोमल नगराळे, आर.के. हायस्कूल पुलगाव, तृतीय आकांक्षा गायकवाड, आदर्श हायस्कूल पुलगाव यांनी प्राप्त केली.
शिक्षक प्रतिकृतीमध्ये प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक बाजीराव चांभारे, जि.प. प्राथ. शाळा सोनोरा, द्वितीय प्रिती गुजर कृष्णा तायल हायस्कूल पुलगाव, तसेच प्रोत्साहन पुरस्कार बी.जी. चव्हाण, जि.प. शाळा बोपापूर वाणी यांनी मिळविला. माध्यमिक विभागात शिक्षक प्रतिकृतीत प्रथम क्रमांक जी.एस. कोरडे, मॅडमवार, हायस्कूल टाकळी दरणे, द्वितीय कमलाकर चौधरी सम्यक हायस्कूल शिरपूर व प्रोत्साहन पुरस्कार एस. बाकरे आर.के. हायस्कूल, पुलगाव यांनी मिळविली. प्रयोगशाळा परिचर प्रतिकृती मध्ये न.प. माध्यमिक शाळेचे राजेंद्र कापटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. प्रास्ताविक न.प. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवप्रसाद बागडे यांनी केले. संचालन कल्पना बागडे यांनी केले. संचालन कल्पना मुंजेवार यांनी केले तर आभार प्रा. पंकज चोरे यांनी मानले.