मंगरुळ येथील शिक्षकांच्या नेहमीच बुट्ट्याने विद्यार्थी त्रस्त
By admin | Published: October 12, 2014 11:47 PM2014-10-12T23:47:22+5:302014-10-12T23:47:22+5:30
परिसरातील केंद्र मंगरूळ (कोरा) येथील शिक्षक, शिक्षिका शाळेला बुट्टया असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी हजेरीपटावर मात्र त्यांची हजेरी राहत असल्याची चर्चा आहे. केंद्र प्रमुखाचेही
Next
कोरा : परिसरातील केंद्र मंगरूळ (कोरा) येथील शिक्षक, शिक्षिका शाळेला बुट्टया असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी हजेरीपटावर मात्र त्यांची हजेरी राहत असल्याची चर्चा आहे. केंद्र प्रमुखाचेही याबाबीला पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. एकही शिक्षक कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. ते ५० ते १०० किमी. अंतरावरून ये-जा करीत आहेत. कित्येक शिक्षक मोटरसायकल वाहनाने येतात व जातात. यात विविध कारणे सांगून ते शाळेला बुट्ट्याही मारत असल्याचे समोर येत आहे. याला केंद ्रप्रमुखाचे सहकार्य असल्याचे बोलले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)