तहसील कार्यालयातील आग लावली की लागली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:12 PM2019-01-12T22:12:12+5:302019-01-12T22:12:40+5:30

अवैध उत्खनन करून रेतीची वाहतूक केल्या जात असल्या प्रकरणी काही जड मालवाहू आर्वी पोलिसांनी जप्त केले. पोलीस ठाण्याच्या आवारात पुरेशी जागा नसल्याने ही मालवाहू तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली.

The tehsil office was set on fire? | तहसील कार्यालयातील आग लावली की लागली?

तहसील कार्यालयातील आग लावली की लागली?

Next
ठळक मुद्देउलटसुलट चर्चेला उधाण : जप्तीतील मालवाहूचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : अवैध उत्खनन करून रेतीची वाहतूक केल्या जात असल्या प्रकरणी काही जड मालवाहू आर्वी पोलिसांनी जप्त केले. पोलीस ठाण्याच्या आवारात पुरेशी जागा नसल्याने ही मालवाहू तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली. याच मालवाहू पैकी एका ट्रकचा टायर शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत जळाल्याचे सांगण्यात येते. परंतु, ही आग लागली की लावली याबाबत शहरात सध्या उलट-सुलट चर्चा होत असल्याने सखोल चौकशीची गरज आहे.
कचरा जाळल्याने वायू प्रदूषणात भर पडत असल्याने स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम राबविताना न.प.च्यावतीने कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. असे असताना तहसील कार्यालयाच्या आवारातील कचºयाला अज्ञात व्यक्तीने आग लावली. यात जप्त केलेल्या एम.एच. ३२ क्यू. ४०२३ क्रमांकाच्या ट्रकचा टायर जळाला. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. तालुक्यात पूर्वी रेती माफियांचा बोलबाला होता;पण तहसीलदारांच्या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणानले. अशातच जप्त करण्यात आलेल्या ट्रकला आग लागल्याने हे प्रकरण दिसते तसे साधे नसल्याचे बोलले जात आहे.

ज्या ट्रकचा टायर आगीत जळाला तो ट्रक कारवाई करून जप्त करण्यात आला आहे. आमच्याकडील कारवाई पूर्ण झाल्याने तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
- विजय पवार, तहसीलदार, आर्वी.

आग लागल्याचे निदर्शनास येताच ती विझविण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीत ट्रकचा एक टायर जळाला आहे. पुढील तपास सुरू आहे.
- संपत चव्हाण, ठाणेदार, आर्वी.

Web Title: The tehsil office was set on fire?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग