तेलंगण, आंध्रातील दीडशे कामगार अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:06+5:30
वर्ध्यातील प्रगतीनगर परिसरात असलेल्या एका कॉस्मॅटिक बनविणाऱ्या कंपनीसह विविध कंपन्या संचारबंदी लागल्याने तसेच लॉकडाउन झाल्याने बंद करण्यात आल्या आहे. कंपनीमालकांनी कंपनीला टाळे ठोकून पळ काढला. तर कामावर असलेल्या कामगारांना मात्र, वाºयावर सोडले आहे. जिल्ह्यासह राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने कामगारांना आपल्या गावी जाता येत नाही. त्यांच्याजवळ दोन वेळचे जेवण मिळेल ऐवढे पैसेही नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्याचे आदेश दिले असताना वर्ध्यातील एका कॉस्मॅटीक कंपनीत प्रशिक्षणाकरीता आलेले तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील सुमारे दीडशेच्यावर कामगार वर्ध्यातच अडकले आहे. त्यासर्वांच्या निवासाची व्यवस्था बच्छराज धर्मशाळेत करण्यात आली असून विविध सामाजिक संघटनांच्यावतीने पुढाकार घेत त्यांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा देण्यात येत आहे.
वर्ध्यातील प्रगतीनगर परिसरात असलेल्या एका कॉस्मॅटिक बनविणाऱ्या कंपनीसह विविध कंपन्या संचारबंदी लागल्याने तसेच लॉकडाउन झाल्याने बंद करण्यात आल्या आहे. कंपनीमालकांनी कंपनीला टाळे ठोकून पळ काढला. तर कामावर असलेल्या कामगारांना मात्र, वाºयावर सोडले आहे. जिल्ह्यासह राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने कामगारांना आपल्या गावी जाता येत नाही. त्यांच्याजवळ दोन वेळचे जेवण मिळेल ऐवढे पैसेही नाही. त्यामुळे मिळेल त्याठीकाणी रात्री काढण्याची वेळ त्यांच्यावर आली असताना शहरातील विविध सामाजिक संघटना, एंजीओ यांनी त्यासर्वांना बच्छराज धर्मशाळेत एकत्र आणून त्यांच्या निवासाची आणि दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटना, सपर्मण संस्था, बचतगट, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, निवसीड चाईल्डलाईन, ऑल इंडिया एक्स बिएसएफ वेल्फेअर संघ, प्रहार वाहन चालक संघटना, युथ फॉर चेंज, जिल्हा अन्नदान समिती आदी विविध सामाजिक स्वयंसेवी संघटनांच्यावतीने त्यांना मदत पुरविण्यात येत आहे.
चारही धर्मशाळेत वैद्यकीय पथकाची नियुक्ती
संचारबंदी लागू झाल्याने जिल्ह्याबाहेरील लोकांचे स्थलांतर होऊ नये, म्हणून अशांची व्यवस्था शहरातील चार धर्मशाळेत करण्यात आली आहे. त्यानुसार बच्छराज धर्मशाळेत राजेश खामनकर, आशिष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदन मोहन धर्मशाळेत मंडळअधिकारी आर.बी. झामरे, प्रदीप मुंघाटे, संत कवरराम धर्मशाळेत तलाठी राजू देशमुख, अविनाश मरघडे तर न्यू इंग्लिश हायस्कूल येथे तलाठी प्रदीप लोन, आणि प्रविण बोबडे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यासर्वांकडे क्वारंटाइन असलेल्यांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्ता, आदींची व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासर्वांवर नियुक्त पथकाची निगराणी राहणार आहे.
कामगारांची वैद्यकीय तपासणी
शास्त्री चौकात असलेल्या बच्छराज धर्मशाळेत आश्रय घेत असलेल्या दीडशे कामगारांची आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यासर्वांना जेथे आहे तेथेच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मजूर घेऊन जाणारे दोन वाहन अडविले
हिंगणघाट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने जिह्यासह राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे कामगार, मजुरांनी घराकडे धाव घेतली आहे. चेन्नईवरून ग्वाल्हेरच्या दिशेने आणि हैदराबादकडून नागपूरकडे मजूर घेऊन जाणाºया वाहनांना हिंगणघाट पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग सात वरील उपजिल्हा रूग्णालय चौकात अडविले. वाहनातील सर्व मजुरांना मोहता शाळेच्या आवारात ठेवण्यात आले असून सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.