तेलंगणातील चोरट्यांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:00 AM2019-12-10T06:00:00+5:302019-12-10T06:00:09+5:30

रविवारी स्थानिक गुन्हे शाखेची दोन चमू गस्तीवर होती. त्यावेळी खात्रीदायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक शास्त्री चौक भागातून बसवा उर्फ पाशा जगदेव मईलार (३३), शेख अन्सार शेख कय्युम (३६) व सैय्यद आझम सैय्यद अकबर (२६) तिन्ही रा. हैद्राबाद यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून एक स्क्रु ड्रायव्हर, एक टॉर्च, दोन मोबाईल व रोख ३,४४९ रुपये जप्त केले.

Telangana gang of thieves arrested | तेलंगणातील चोरट्यांची टोळी जेरबंद

तेलंगणातील चोरट्यांची टोळी जेरबंद

Next
ठळक मुद्देवर्धा अन् अमरावती जिल्ह्यात चोरी केल्याची दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धासह अमरावती जिल्ह्यात चोऱ्या करणाºया तेलंगणा येथील चोरट्यांच्या टाळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या सूचनांवरून विशेष मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे या टोळीला अटक करण्यात आली आहे.
रविवारी स्थानिक गुन्हे शाखेची दोन चमू गस्तीवर होती. त्यावेळी खात्रीदायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक शास्त्री चौक भागातून बसवा उर्फ पाशा जगदेव मईलार (३३), शेख अन्सार शेख कय्युम (३६) व सैय्यद आझम सैय्यद अकबर (२६) तिन्ही रा. हैद्राबाद यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून एक स्क्रु ड्रायव्हर, एक टॉर्च, दोन मोबाईल व रोख ३,४४९ रुपये जप्त केले. पोलिसी हिसका मिळताच या संशयितांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरी केल्याची कबुली दिली. शिवाय अमरावती व वर्धा जिल्ह्यातही चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी हे तेलंगणा राज्यातील रहिवासी असून टोळीने परिसरात येऊन कुलूपबंद दुकानांना टार्गेट करतात. इतकेच नव्हे तर कुलूपबंद दुकानाचे शटर एका विशिष्ट पद्धतीने उघडून दुकानातून मुद्देमाल पळविण्याचे सवईचे असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

Web Title: Telangana gang of thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.