वाढत्या काँक्रिटीकरणामुळे तापमानाचा तडाखा

By admin | Published: March 23, 2016 02:06 AM2016-03-23T02:06:50+5:302016-03-23T02:06:50+5:30

खेडे ओस होत असून शहरी भाग झपाट्याने वाढत आहेत. या सोबतच शहरात काँक्रिटीकरणही वाढत आहे. या काँक्रिटीकरणामुळे

Temperate temperature due to increasing concretion | वाढत्या काँक्रिटीकरणामुळे तापमानाचा तडाखा

वाढत्या काँक्रिटीकरणामुळे तापमानाचा तडाखा

Next

श्रेया केने ल्ल वर्धा
खेडे ओस होत असून शहरी भाग झपाट्याने वाढत आहेत. या सोबतच शहरात काँक्रिटीकरणही वाढत आहे. या काँक्रिटीकरणामुळे वातावरणातील उष्णताशोषक घटकांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले आहे. उष्णताशोषक घटकांच्या झालेल्या ऱ्हासामुळेच तापमानात वाढ होत असल्याची बाब निरीक्षणातून वैज्ञानिकांच्या निदर्शनात आली आहे. यातून बचावाकरिता नागरिकांत जागृती निर्माण करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
हवामान बदलाच्या संदर्भात भारतीय वेधशाळेकडून निरीक्षण नोंदविले जातात. यात निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेप हवामान बदलास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. वाढत्या शहरीकरणासह काँक्रिटीकरण झपाट्याने होत आहे. पूर्वी कच्चे रस्ते असायचे. आता झगमगटाच्या नावाखाली शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातूनही कच्चे रस्ते हद्दपार झाले आहे. सर्रास सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. शिवाय घरबांधकामातही सिमेंट, काँक्रिटचा वापर होत आहे. शहरीकरणाच्या प्रक्रियेत तर मोठ्या इमारती निर्माण होत काँक्रिटचे जंगल तयार होवू लागले आहे. या काँक्रिटीकरणाकरिता झाडांची कत्तल होत असून हिरव्या जंगलाऐवजी सिमेंटचे जंगल वाढत आहे.
यामुळे उष्णताशोषक घटकांच्या संख्येत घट झाली आहे. प्रखर सूर्यकिरणांना शोषून वातावरण शीत राखण्यास मदत करणारे घटक कमी होवून उष्णता परावर्तीत करणाऱ्या घटकांमध्ये वाढ होवू लागली आहे. बदलत्या जीवन शैलीसह वापरात येणाऱ्या विविध साधनांमुळे उष्णतामान वाढविणाऱ्या घटकांत भरच पडत आहे. यासह दळणवळणाची साधने, त्यातून होणारे प्रदूषण, तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे.
जिल्ह्यातील वनसंपदा, वनक्षेत्र कायम असले तरीही मानवी वस्तीचा विस्तार होताना त्या परिसरातील झाडांची कत्तल होत आहे. याला पर्याय म्हणून वृक्षारोपण होत असले तरीही त्याची गती मंद आहे. तुलनेने झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याचा थेट परिणाम हवामान बदलाच्या स्वरूपात मानवाला भोगावा लागत असून फेब्रुवारी महिन्यातच पारा ३५ अंशापुढे गेला आहे. याविषयी जागरूकता बाळगण्याची गरज असल्याचे मत वैज्ञानिकांनी नोंदविले आहे.

४हवामान बदलामुळे मानवासह प्राणिमात्रांना अनेक गंभीर स्वरूपाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातील एक म्हणजे ऋतूबद्दल उन्हाळ्यात वाढलेला कालावधी. या सर्व परिणामांपासून निसर्गाचे रक्षण करण्याकरिता जागतिक स्तरावर प्रयत्न होत असून जागरूकता निर्माण करण्यासाठी २३ मार्च हा हवामान दिन म्हणून साजरा केला आहे. शासनस्तरावर हा दिन साजरा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असून याशिवाय प्रत्यक्षात कृती करण्याची गरज वैज्ञानिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.

वाढते काँक्रिटीकरण उष्णता वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनात आले आहे. मानवी वस्ती व परिसरातून उष्णता शोषक घटक बाद होत असून तापमान वाढीस हे घटक जबाबदार आहेत. एकाएकी तापमान वाढल्याने समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनाची प्रक्रिया अधिक गतिमान होते. परिणामी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढून पाऊस पडतो. वेळीअवेळी होणाऱ्या पावसाचे हे देखील मुख्य कारण आहे.
- बी. एस. आवळे, सहायक वैज्ञानिक, भारतीय वेधशाळा, नागपूर विभाग, जि. नागपूर.

Web Title: Temperate temperature due to increasing concretion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.