ट्रक व काळीपिवळी अपघातात १० प्रवासी जखमी
By admin | Published: March 18, 2016 02:20 AM2016-03-18T02:20:17+5:302016-03-18T02:20:17+5:30
येथील चौरस्त्यावर भरधाव ट्रकने राळेगावकडे जात असलेल्या काळीपिवळीला धडक दिली.
वायगाव चौरस्त्यावरील घटना
वायगाव (निपाणी) : येथील चौरस्त्यावर भरधाव ट्रकने राळेगावकडे जात असलेल्या काळीपिवळीला धडक दिली. यात १० जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली.
अपघातात काळीपिवळीचालक मनोज कोपरे रा. राळेगाव याच्यासह प्रवासी मालता हनुमान आडे रा. सावंगी, रजनी गणपत साहू (३२) रा. पुणे, वामन गणपत साहू (६३) रा. ममदापूर, वैशाली रामेश्वर पडोळे (३२) रा. पाथरी, साधना अंकुश पाटील (३५) रा. पाथरी, अंजू प्रमोद वाघमारे (४०) रा. कानगाव, नंदा श्रावण बन्सोड (४०) रा. सेलसुरा, लक्ष्मण दशरथ दांडेकर (६०) रा. कानगाव व आकाश भगत रा. वर्धा हे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमएच २९ २८६३ क्रमांकाची काळीपिवळी वर्धेवरून राळेगावकडे प्रवासी घेवून जात होती. दरम्यान देवळीकडून हिंगणघाकडे जाणाऱ्या ट्रक एम.एच.३१ सीओ.७२३९ क्रमांकाच्या ट्रकचा डाव्या बाजूचा टायर फुटल्याने तो काळीपिवळीवर धडकला. यात काळीपिवळी समारे ६० फुटापर्यंत फरफटत गेली. यात काळीपिवळी चालकासह नऊ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. अपघातानंतर शेळ्या भरलेला हा ट्रक सोडून चालक व त्याचा वाहक घटनास्थळावरून पसार झाले. अपघाताची माहिती गावात मिळताच एकच कल्लोळ उठला होता. घटनेची माहिती मिळताच वायगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघातातील गंभीर प्रवाश्यांना शेख अब्दुल नहीम (बाबा) यांनी स्वत: रुग्णालयात उपचारासाठी नेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(वार्ताहर)