निसर्गकोपाचे दहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 06:00 AM2019-11-08T06:00:00+5:302019-11-08T06:00:22+5:30

मागील उन्हाळ्यातील जलाशयांची खालावलेली पातळी आणि दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे यावर्षी जलाशयाची पातळी सुधारेल की नाही, अशी शंका होती. पण; उशिरा का होईना आलेल्या दमदार पावसाने सर्वच जलाशय ओव्हरफ्लो करुनच उसंत घेतली. त्यामुळे नदी-नाल्यांनाही पूर आल्याने या पुरामध्ये सात जण वाहून गेले.

The ten victims of Nature's wrath | निसर्गकोपाचे दहा बळी

निसर्गकोपाचे दहा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देनैसर्गिक आपत्ती : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यावर्षी वरुणराजाने तब्बल दीड महिना उशिराने कृपादृष्टी करित जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत नदी-नाल्यांना आलेला पूर आणि विजेच्या स्पर्शाने जिल्ह्यातील दहा जणांना आपला जीव गमवावा लागल तर पाच जण जखमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मागील उन्हाळ्यातील जलाशयांची खालावलेली पातळी आणि दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे यावर्षी जलाशयाची पातळी सुधारेल की नाही, अशी शंका होती. पण; उशिरा का होईना आलेल्या दमदार पावसाने सर्वच जलाशय ओव्हरफ्लो करुनच उसंत घेतली. त्यामुळे नदी-नाल्यांनाही पूर आल्याने या पुरामध्ये सात जण वाहून गेले. यामध्ये बाहेर राज्यातील एकाचा समावेश आहे. या सात जणांपैकी एकाचा अद्यापही मृतदेह सापडला नसल्याची नोंद आहे.
यासोबतच शेतशिवारात काम करीत असताना पडलेल्या विजेमुळेही तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. तर पाच जण जखमी झाले होते. जखमींवर उपचार केल्याने सध्या त्यांची प्रकृती सुधारली आहे.
या निसर्ग कोपामुळे चार महिन्यात दहा जणांचा बळी गेला असून शासनानेही याची नोंद घेत तत्काळ आर्थिक मदत दिली आहे.

८९ जनावरे दगावली
नैसर्गीक आपत्तीचा जनसामान्यांसह पुशधनालाही मोठा फटका बसला. या चार महिन्यात जिल्ह्यातील जवळपास ८९ जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये मोठी दुधाळ जनावरे ४०, लहान जनावरे २४, बैल २४ आणि १ गोºह्याचा समावेश आहे. ऐन हंगामात पूर आणि विज पडल्यामुळे जनावरे दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दगावलेल्या जनावरांची किंमत जास्त असतानाही शासनाकडून मिळालेली मदत ही तोकड्या स्वरुपाची असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

मृतकाच्या परिवाराला मिळाली शासकीय मदत
शासनाकडून मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी चार लाखाची मदत देण्यात आली. वीज पडून मृत पावलेल्या तिघांपैकी दोघांना मदत मिळाली असून एकाला मदत देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर पुरात वाहून गेलेल्या सात जणांपैकी एक बाहेर राज्यातील आहे तर एकाचा मृतदेह अद्याप सापडला नाही. त्यामुळे उर्वरित मृतकांच्या परिवाराला प्रत्येकी ४ लाख रुपयांप्रमाणे मदत देण्यात आली.
यासोबतच जखमींना मदत मिळाली असून एक आठवड्यापर्यंत रुग्णालयात उपचार घेणाºयाला ४ हजार ३०० रुपये तर एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस उपचार घेणाऱ्याला १२ हजार ७०० रुपयाची मदत दिली आहे.
नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या ४० मोठ्या दुधाळ जनावरांच्या मालकांना प्रत्येकी ३० हजार रुपये तर लहान दुधाळ जनावरे, बैल अशा ४८ जनावरांच्या मालकांना प्रत्येकी २५ हजार आणि गोºह्याच्या मोबदल्यात १६ हजार रुपयाची शासनाने मदत दिली आहे.

Web Title: The ten victims of Nature's wrath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग