भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 09:20 PM2019-05-12T21:20:32+5:302019-05-12T21:21:33+5:30

घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे.

The tenants are not registered in the police station | भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात नाही

भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात नाही

Next
ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव : पोलीस विभागही गंभीर नाही, कायदा अस्तित्वात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे.
बापूंचे सेवाग्रामातील वास्तव्य, स्वातंत्र्य संग्रामाची त्यांनी आश्रमातून हलविलेली सूत्रे, पवनार येथील आचार्य विनोबा भावेंचा आश्रम, पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडार यामुळे वर्धा जिल्ह्याचा संपूर्ण जगभरात नावलौकिक आहे. याशिवाय देशातील सर्वांत लहान सहाव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळेच वर्षाकाठी येथे लाखो देशी-विदेशी पर्यटक सातत्याने येत असतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालये, केंद्राच्या अखत्यारितील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय  हिंदी विश्वविद्यालय आदी असल्याने शिक्षणाचेही वर्धा हब आहे. यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातीलच नव्हे, तर इतर राज्य आणि देशातील कुटुंबे वर्ध्यात स्थायी-अस्थायी स्वरूपात वास्तव्याला आहेत. वर्ध्यात कुणाकडे अस्थायी स्वरूपात राहायला व्यक्ती, कुटुंबाने संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करणे गरजेचे आहे. कुणाविषयी संशय असल्यास पोलिसांकडून त्याची खातरजमा केली जाते. मात्र, या नियमाविषयी पोलीस विभाग अर्थात गृह विभागाकडूनही आजवर प्रभावी जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे वर्ध्यासारख्या जगात ख्याती असलेल्या जिल्ह्यात कुणीही येतो अन् कुणीही येतो, असाच अजब प्रकार सुरू आहे. यामुळे गांधी जिल्ह्याच्या सुरक्षेविषयीच प्रश्न निर्माण झाला आहे. वर्ध्यातील साईनगर, स्वागत कॉलनी, स्रेहलनगर, धन्वंतरीनगर, गजानननगर, गोंड प्लॉट, आलोडी, नालवाडी व अन्य भागांत मोठ्या प्रमाणावर भाडेकरू आहेत. मागील महिन्यातच इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्याच्या कुटुंबातील महिलेला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चमूने ताब्यात घेतले. ही महिलादेखील म्हसाळ्यातील एका निवासस्थानी भाडेकरू म्हणून वास्तव्याला होती. वर्ध्यासारख्या महत्त्वाच्या शहरात घातपात घडविण्याचे या संघटनेचे मनसुबे होते की काय, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

घरमालकाने भाडेकरूची नोंद करावी हा नियम केवळ बड्या शहरांनाच नव्हे, तर छोट्या शहरांनाही लागू आहे. घरमालकांनी भाडेकरूची नोंद करायलाच हवी. नोंदणी नंतर काही विभागाला काही आढळून आल्यास व्हेरिफिकेशन केले जाते. शहरातील घरमालकांनी भाडेकरूची नोंद करून पोलीस विभागाला सहकार्य करावे.
- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा.

Web Title: The tenants are not registered in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस