कोतवालांवर कामाचा ताण
By admin | Published: July 5, 2017 12:29 AM2017-07-05T00:29:03+5:302017-07-05T00:29:03+5:30
कोतवालांना अतिरिक्त कामे देऊ नये, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिती शाखा समुद्रपूर यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
कामाबाबत आदेश कमी करा : प्रवास भत्ता वाढविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : कोतवालांना अतिरिक्त कामे देऊ नये, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिती शाखा समुद्रपूर यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यात अतिरीक्त आदेश कमी करण्याच्या प्रमुख मागणीसह प्रवास भत्त्यात वाढ करण्याचा समावेश आहे.
कोतवाल या पदाची नियुक्ती साझ्यातील गावात तलाठी यांना सहकार्य करण्यासाठी केलेली असते. मात्र तहसीलदारांच्या आदेशानुसार कोतवालांना निवडणूकसंबंधीची विविध कामे करावी लागतात. तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुममधील दस्ताऐवज शोधून देण्यासाठी सुद्धा कोतवालांना आदेशीत केले जाते. नैसर्गिक आपत्ती कक्षात रात्रीच्यावेळी चौकीदार म्हणून देखील जबाबदारीचे काम दिल्या जाते. प्रसंगी तहसील कार्यालयाचे टपाल सुद्धा पोहचवावे लागते. याचा प्रवास भत्ता सुद्धा १०० रुपयांपेक्षा जास्त दिल्या जात नाही. अतिरीक्त कामाचा व्याप वाढल्याने दैनंदिन कामे खोळंबतात. निवेदन देताना सागर भगत, भारत फुलझेले, यशवंत चाटे, आनंद मुंजेवार, प्रकाश बकाल, कवडू धुर्वे यांची उपस्थिती होती.
$$्अितिरिक्त कामे मागे घ्या, तहसीलदारांना निवेदन
कोतवालांची नियुक्ती असलेल्या तलाठी साझ्याच्या व्यतिरिक्त कामे कोतवालांना अतिशय तुटपुंज्या वेतनावर करावी लागतात. त्यामुळे त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण होत आहे.
तलाठी साझ्याशिवाय अतिरिक्त कामांचे आदेश कोतवालांना देण्यात येऊ नये. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
अतिरीक्त कामाचा व्याप वाढल्याने त्यांची दैनंदिन कामे खोळंबतात. सदरची कामे पूर्ण करताना शारीरिक व मानसिक ताण येतो. त्यामुळे अतिरीक्त कामाचा आदेश मागे घेण्याची मागणी आहे.