व्याघ्र दर्शनामुळे दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:56 PM2018-10-01T22:56:53+5:302018-10-01T22:57:37+5:30
तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात वाघाने दर्शन होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास टाळत असून वन्यप्राण्यांकडून उभ्या शेतपिकांची नासडी केली जात आहे. त्यामुळे या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात वाघाने दर्शन होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास टाळत असून वन्यप्राण्यांकडून उभ्या शेतपिकांची नासडी केली जात आहे. त्यामुळे या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे.
हिंगणघाट तालुका आतापर्यंत वाघाच्या प्रकोपापासून दूरच होता. मात्र, आता या भागातही पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने त्याबाबतची नोंद घेण्यात आली आहे. या वाघाचा सध्या लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात मुक्तसंचार होत असल्याने शेतीची विविध कामे सध्या ठप्प पडली आहेत. आज सकाळी वाघाने बैलाला गतप्राण केल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लाडकी व सावंगी (हेटी) शिवार चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्याला लागून आहे. शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी येथील रेल्वे पुलाजवळ पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास व्याघ्र दर्शन झाले. तेव्हापासून वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
दहा गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगणघाट तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) शिवारात पट्टेदार वाघ दिसून येत असल्याने अनुचित घटना टाळण्यासाठी वन विभागाच्यावतीने परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या गावातील नागरिकांना दिवसाला एकटे फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय लहान मुलांसह महिलांना रात्रीला घराबाहेर निघण्याचे टाळण्यास सांगण्यात आले आहे. या भागात मुक्तसंचार होणार वाघ सुमारे ३ वर्षांचा असल्याचे सांगण्यात येते. तर वन विभागाची सात अधिकाºयांसह कर्मचाºयांची चमु सध्या परिसरात गस्त घालत आहेत.
बैलाचा पाडला फडशा
वडनेर/ हिंगणघाट : नजीकच्या सारंगी (हेटी) शिवारात व्याघ्र दर्शन होत असल्याने या भागातील नागरिकांसह शेतकºयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर वाघाच्या भीतीमुळे या भागातील शेतीची कामे पुर्णपणे ठप्प झाली आहेत. अनिल किसना साबळे यांच्या मालकीचा बैलाचा वाघाने फडशा पाडला. यामुळे त्यांचे बºयापैकी नुकसान झाले आहे. तर दिलीप राऊत, गोपीनाथ दाते, हर्षल सावंकार यांना नदीच्या काठच्या परिसरात वाघाचे दर्शन झाले. घटनेची माहिती मिळताच वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहायक एस. ए.काटकर, अमोल पिसे, प्रदीप थुल व प्रदीप दळवेयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.