वर्ध्यातील रामनगरच्या हाय रिस्कमधील ८ लोकांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 03:22 PM2020-06-10T15:22:35+5:302020-06-10T15:22:58+5:30

वर्ध्यातील हाय रिस्क मधील ८ लोकांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. हे सर्व व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या निकट संपर्कातील आहेत.

Test report of 8 high risk people of Ramnagar in Wardha is negative | वर्ध्यातील रामनगरच्या हाय रिस्कमधील ८ लोकांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह

वर्ध्यातील रामनगरच्या हाय रिस्कमधील ८ लोकांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा १३

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: वर्धा शहराच्या रामनगर येथील रहिवासी असलेल्या ५९ वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान त्यांच्या घरातील ५ व्यक्ती आणि इतर ३ व्यक्ती जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये ठेवत त्यांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज हाय रिस्क मधील ८ लोकांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. हे सर्व व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या निकट संपर्कातील आहेत.
कोरोना रुग्ण आढळल्यानंतर रामनगर परिसरातील काही भाग कंटेन्मेंट झोन घोषित करत नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुरवात करण्यात आली आहे.
दरम्यान जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत तर २ रुग्णांवर इतर जिल्ह्यात उपचार करण्यात येत आहेत.

Web Title: Test report of 8 high risk people of Ramnagar in Wardha is negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.