पेपरफूट प्रकरण : प्रीतीशने वर्ध्यात खरेदी केली कोट्यवधींची मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 12:45 PM2021-12-26T12:45:54+5:302021-12-26T12:48:38+5:30

वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनी सुरू केली आणि त्यातूनच कोट्यवधींची माया जमविणे सुरू केले. पेपरफूट प्रकरण पुढे आल्यानंतर त्याच्या संपत्तीचा पेटारा खुलू लागला आहे.

TET paper leak scam accused pritish deshmukh bought land and cars worth crores in two years | पेपरफूट प्रकरण : प्रीतीशने वर्ध्यात खरेदी केली कोट्यवधींची मालमत्ता

पेपरफूट प्रकरण : प्रीतीशने वर्ध्यात खरेदी केली कोट्यवधींची मालमत्ता

googlenewsNext
ठळक मुद्दे झटपट श्रीमंत झाल्याने अनेकांच्या उंचावल्या भुवया

चैतन्य जोशी

वर्धा : आरोग्य विभागासह टीईटी परीक्षेच्या पेपरफूट घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार डॉ. प्रीतीश देशमुख याला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर वर्ध्यातही त्याच्या संपत्तीबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

त्याने मागील दोन वर्षांत त्याच्या स्नेहलनगर परिसरातील निवासस्थानालगतच १ कोटी ३० लाख रुपयांची ८ हजार स्क्वेअर फूट जागा आणि दीड कोटी रुपयांची मर्सिडीज बेन्झ ही आलिशान कार खरेदी केल्याची माहिती आता पुढे आली आहे. त्यामुळे प्रीतीशची स्थावर मालमत्ता आहे तरी किती, अशी चर्चा शहरात रंगू लागली असून, पुणे पोलिसांनी ही बाजूदेखील तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनी सुरू केली आणि त्यातूनच कोट्यवधींची माया जमविणे सुरू केले. पेपरफूट प्रकरण पुढे आल्यानंतर त्याच्या संपत्तीचा पेटारा खुलू लागला आहे. त्याच्याजवळ पाच ते सात आलिशान गाड्या असून, त्याने दोन गाड्यांचा व्हीआयपी क्रमांक मिळविण्यासाठी आरटीओत दीड ते दोन लाख रुपये मोजल्याचे आता उघड झाले आहे. त्याने आणखी कुठे मालमत्ता खरेदी केली याचा शोध घेण्याची गरज आहे.

विविध राजकीय नेत्यांना भेटायचा प्रीतीश

शहरासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांतील नेत्यांना प्रीतीश मुंबईसह नागपुरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयात भेटत होता. मोठ्या नेत्यांशी ओळख असल्याने त्यांच्याबाबत तो एकेरी भाषेतच बोलायचा. पेपरफूट प्रकरण पुढे आल्याने जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळी हाच तो प्रीतीश जो राजकीय पक्षांच्या कार्यालयात भेटायचा असे सांगत आहेत.

अंतिम वर्षात झाला होता फेल

प्रीतीशने वैद्यकीय शिक्षण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. मात्र, तो फायनल ईअरमध्ये फेल झाल्याचीही माहिती पुढे आली आहे. इतकेच नव्हे, तर तो हॉस्टेलला न राहता बाहेर आलिशान हॉटेलमध्ये राहत होता, अशी माहितीही पुढे येऊ लागली आहे.

Web Title: TET paper leak scam accused pritish deshmukh bought land and cars worth crores in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.