टेक्सटाईल्स कापड दुकानाला आग, 50 लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 12:12 PM2020-10-17T12:12:17+5:302020-10-17T12:12:31+5:30

व्यापारी सुनील पितलिया यांचे जगन्नाथ वार्डातील मुख्य मार्गावर वर्धमान टेक्सटाइल्स हे कापड दुकान असून पहिल्या माळ्यावर निवासस्थान  आहे. आज पहाटे तीन वाजताचे सुमारास दुकानाला आग लागली

Textile cloth shop fire, loss of Rs 50 lakh in wardha | टेक्सटाईल्स कापड दुकानाला आग, 50 लाखांचे नुकसान

टेक्सटाईल्स कापड दुकानाला आग, 50 लाखांचे नुकसान

Next

हिंगणघाट - स्थानिक जग्गनाथ वार्ड येथील मुख्य मार्गावर स्थित वर्धमान टेक्सटाइल्स या रेडीमेड कापड दुकानसहित निवास स्थानाला आज पहाटे ३ वाजताचे सुमारास भीषण आग लागून ५० लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीत दुकान मालक सुनील पितलिया , त्यांची पत्नी कोमल पितलिया, मूलगा राज ,मुलगी रिया जखमी झाल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आग विझविताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्निशामन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची शंका व्यक्त होत आहे. 

व्यापारी सुनील पितलिया यांचे जगन्नाथ वार्डातील मुख्य मार्गावर वर्धमान टेक्सटाइल्स हे कापड दुकान असून पहिल्या माळ्यावर निवासस्थान  आहे. आज पहाटे तीन वाजताचे सुमारास दुकानाला आग लागली, यात मोठ्या प्रमाणात रेडिमेड कापड साहित्य होते. आग लागल्याने धुराचे लोट पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचले. यावर दोन्ही माळ्यावर पितलिया यांचे निवासस्थान आहे.  आगीमुळे प्रचंड उकाडा निर्माण झाल्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले आहेत. पहिल्या माळ्यावर आगीचे लोट पोहचल्याने कुटुंबातील सदस्यांनी जीव वाचविण्यासाठी पहिल्या माळ्यावरील बाल्कनीतून शेडवर उडया मारल्या व खाली सुखरूप उतरले. पण, आग लागल्याने ते काही प्रमाणात जखमी झाले. दरम्यान आगीचे लोट दिसू लागल्याने शेजारी जागे झाले. त्यांनी लगेच हिंगणघाट नागरपालिकेच्या अग्निशामन दलाला माहिती दिल्यानंतर लगेच दाखल झाले व आग विझविली. मात्र, तत्पुरवी दुकानातील व घरातील पूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. दरम्यान, आग विझविताना सिलेंडरचा स्फोट होऊन अग्निशामन दलाचे नितिन जंगले व गणेश सायंकार हे दोन कर्मचारी जखमी झाले. सदर आगीत ५० लाख नुकसानिचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Textile cloth shop fire, loss of Rs 50 lakh in wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.