दुचाकीवरुन नियंत्रण सुटले अन् चालकावर ओढवला काळ

By चैतन्य जोशी | Updated: March 2, 2023 17:27 IST2023-03-02T17:27:23+5:302023-03-02T17:27:23+5:30

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकून चालक पुलाखाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

The bike lost control and hit the driver | दुचाकीवरुन नियंत्रण सुटले अन् चालकावर ओढवला काळ

दुचाकीवरुन नियंत्रण सुटले अन् चालकावर ओढवला काळ

वर्धा : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकून चालक पुलाखाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात हिंगणघाट ते जाम रस्त्यावरील उब्दा शिवारात १ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास झाला. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी नोंद घेतली. शिवपाल शिंपी रा. काजी वॉर्ड हिंगणघाट असे मृतकाचे नाव आहे.

शिवपाल शिंपी हे त्यांच्या एम.एच. ३२ एल. ५७४० क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाट येथून समुद्रपूरकडे हायवेने जात होते. सुसाट वाहनावरुन त्यांचे अचानक नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याकडेला असलेल्या कठड्याला जाऊन धडकली. धडकेत शिवपाल नाल्याच्या पुलाखाली पडले. शिवपालच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून पंचनामा केला. याअपघाताची समुद्रपूर पोलिसांनी नोंद घेतली.

Web Title: The bike lost control and hit the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.