चालकाची प्रकृती अचानक बिघडली, धावती बस दुभाजकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:16 AM2022-09-20T06:16:59+5:302022-09-20T06:18:09+5:30

पुलगाव आगारात दिनकर शंकर जामणेकर (५०) हे चालक म्हणून कार्यरत आहेत.

The condition of the driver deteriorated, the running bus on the bifurcation | चालकाची प्रकृती अचानक बिघडली, धावती बस दुभाजकावर

चालकाची प्रकृती अचानक बिघडली, धावती बस दुभाजकावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रवासी घेऊन चंद्रपूरच्या दिशेने निघालेल्या पुलगाव आगाराच्या बसच्या चालकाची धावत्या बसमध्ये अचानक प्रकृती बिघडली. अशातच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट दुभाजकावर चढले. ही घटना चंद्रपूर मार्गावरील आरंभा टोलजवळ सोमवारी घडली असून, प्रवासी थोडक्यात बचावले, पण बसचे मोठे नुकसान झाले आहे. 

पुलगाव आगारात दिनकर शंकर जामणेकर (५०) हे चालक म्हणून कार्यरत आहेत. ते सोमवारी बस घेऊन पुलगाव स्थानकावर पोहोचले.
प्रवासी घेऊन चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. भरधाव बस आरंभा टोल नाक्याजवळ आली असता, दिनकर यांची प्रकृती अचानक बिघडली. ते स्वत:सह बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असतानाच, वाहन थेट रस्ता दुभाजकावर चढले. चालकाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच, वाहक आशिष
धांदे यांनी वरिष्ठांना माहिती देत, दिनकर यांना रुग्णालयात नेण्यासाठी धडपड केली. रुग्णवाहिकेच्या साहाय्याने दिनकर यांना तातडीने समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: The condition of the driver deteriorated, the running bus on the bifurcation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.