डॉक्टराने केली रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीस शिवीगाळ, विवाहितेची पोलिसांत तक्रार

By महेश सायखेडे | Updated: August 18, 2023 17:19 IST2023-08-18T17:19:01+5:302023-08-18T17:19:53+5:30

वर्धा : रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीस चक्क डॉक्टरने वाद करून शिवीगाळ केली. आरोपी डॉक्टर इतक्यावरच थांबला नाही तर त्याने ...

The doctor abused the wife of the railway police officer, filed a complaint with the police | डॉक्टराने केली रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीस शिवीगाळ, विवाहितेची पोलिसांत तक्रार

डॉक्टराने केली रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीस शिवीगाळ, विवाहितेची पोलिसांत तक्रार

वर्धा : रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीस चक्क डॉक्टरने वाद करून शिवीगाळ केली. आरोपी डॉक्टर इतक्यावरच थांबला नाही तर त्याने संबंधित पीडित महिलेला बघून घेण्याची धमकीही दिली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात पीडित विवाहितेने तक्रार नोंदविली आहे.

पोलिसांनीही आरोपी डॉक्टर विरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित विवाहितेचा पती रेल्वे पोलिस कर्मचारी आहेत. संबंधित महिलेने तिच्या मुलासाठी डॉ.अश्विन कांबळे, रा.सानेवाडी, गौरक्षण वॉर्ड याच्याकडून सेकंड हॅण्ड सायकल खरेदी केली. पण, काही दिवसांनी सायकलचे पार्ट तुटायला लागले. परिणामी विवाहिता ही डॉ.अश्विन कांबळे यांना संबंधित माहिती देण्यासाठी त्यांच्या दवाखान्यात गेली. विवाहितेने सायकलचे पार्ट तुटत असल्याचे सांगताच डॉ.कांबळे याने विवाहितेला अश्लील शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.

Web Title: The doctor abused the wife of the railway police officer, filed a complaint with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.