मांस विक्रेत्याच्या गळ्यावर मुलीने फिरविला सत्तूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 19:06 IST2022-03-31T19:05:41+5:302022-03-31T19:06:15+5:30
Wardha News उधार मांस न दिल्याने मुलीने मांस विक्रेत्याच्या गळ्यावर सत्तूर फिरवून वार करीत त्याला जखमी केले. ही घटना सेवाग्राम चौकात ३० रोजी घडली.

मांस विक्रेत्याच्या गळ्यावर मुलीने फिरविला सत्तूर
वर्धा : उधार मांस न दिल्याने मुलीने मांस विक्रेत्याच्या गळ्यावर सत्तूर फिरवून वार करीत त्याला जखमी केले. ही घटना सेवाग्राम चौकात ३० रोजी घडली.
विलास वासुदेव गुढे याचा मांस विक्रीचा व्यवसाय आहे. रमेश कान्होरे हा मांस घेण्यास गेला असता, त्याने उधार मांस मागितले. विलासने आधीचे पैसे द्या, नंतर मांस देतो, असे म्हटले असता, रमेश तेथून निघून गेला. काही वेळाने रमेश पुन्हा त्याच्या मुलीसोबत तेथे आला असता, मुलीने दुकानातील सत्तूर उचलून थेट विलासच्या गळ्यावर फिरवून वार करीत त्यास जखमी केले. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.