मानसिक त्रासातून मुख्याध्यापकाने घेतला गळफास; गटशिक्षणाधिकाऱ्यांसह २ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 06:26 PM2022-03-19T18:26:43+5:302022-03-19T18:31:08+5:30

मृत विवेक महाकाळाकर हे दिव्यांग असून ते काचनूर येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीवर होते. आरोपी हे नेहमी त्यांना दिव्यांग असल्याकारणाने चिडवायचे, त्यांना मानसिक त्रास द्यायचे.

The headmaster strangled himself over mental anguished by 2 teachers including group education officer in wardha | मानसिक त्रासातून मुख्याध्यापकाने घेतला गळफास; गटशिक्षणाधिकाऱ्यांसह २ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

मानसिक त्रासातून मुख्याध्यापकाने घेतला गळफास; गटशिक्षणाधिकाऱ्यांसह २ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

वर्धा : गटशिक्षणाधिकाऱ्यांसह दोन शिक्षकांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून काचनूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेल्या विवेक यादवराव महाकाळकर (वय ५३, रा. इसाजी ले-आऊट, सुदामपुरी) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह दोन केंद्रप्रमुखांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत विवेक महाकाळाकर हे दिव्यांग असून ते काचनूर येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीवर होते. आरोपी हे नेहमी त्यांना दिव्यांग असल्याकारणाने चिडवायचे. तसेच हातमोड्या हातमोड्या म्हणून नेहमी त्यांची ॲक्शन करून त्यांना मानसिक त्रास द्यायचे. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर विवेक महाकाळकर यांनी बुधवारी १६ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडीवार, एपीआय गणेश बैरागी यांनी भेट देत पाहणी केली. पाहणीदरम्यान तेथे सुसाईड नोट लिहिलेली दिसून आली. ते पत्र पोलिसांनी जप्त करीत काचनूर येथील सहायक शिक्षक मुकुंद बोराडे रा. वैष्णवी कॉम्प्लेक्स कारला रोड, गटशिक्षणाधिकारी धनराज तायडे रा. म्हाडा कॉलनी आणि वसंत खोडे यांच्याविरुद्ध विवेक महाकाळकर यांची पत्नी संगीता महाकाळकर यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे ठाणेदार बंडीवार यांनी सांगितले.

मृत विवेक यांनी यापूर्वीही केली होती तक्रार...

मृतक विवेक महाकाळकर यांनी २६ फेब्रुवारी रोजी आर्वी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे आरोपींविरुद्ध तक्रार दिली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने विवेक यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

जि.प. सीईओंना करणार पत्रव्यवहार

मृत विवेक महाकाळकर यांचा गटशिक्षणाधिकारी धनराज तायडे, बोराडे आणि खोडे यांच्याशी कार्यालयीन कामकाजाविषयी वाद होता. याची योग्य चौकशी करण्यासाठी शहर पोलिसांच्या वतीने जि.प. सीईओ डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे पत्र पाठविण्यात येणार असून या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी सांगितले.

काय लिहिले होते सुसाईड नोटमध्ये?

पोलिसांनी मृत विवेक महाकाळकर यांच्या खोलीची पाहणी केली असता खोलीत एक चिठ्ठी मिळून आली. त्या चिठ्ठीत तिन्ही आरोपी मला नेहमी मानसिक त्रास द्यायचे. या मानसिक त्रासातून मी आत्महत्या करीत असल्याने पत्रात लिहून होते. आत्महत्येला तिन्ही आरोपी जबाबदार असल्याचे पत्रात लिहून असल्याने पत्नी संगीता महाकाळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: The headmaster strangled himself over mental anguished by 2 teachers including group education officer in wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.