ॲपवरून समजेल रुग्णवाहिकेचे लोकेशन! एका क्लिकवर बोलावता येणार रुग्णवाहिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:12 IST2024-11-21T18:10:32+5:302024-11-21T18:12:03+5:30
Wardha : आणीबाणीच्या प्रसंगात सर्वसामान्यांना होणार मोठा लाभ

The location of the ambulance will be known from the app! Ambulance can be called with one click
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका आता अद्ययावत करण्यात येणार आहे. '१०८ रुग्णवाहिका मोबाइल अॅपद्वारेही उपलब्ध असेल. या अॅपवरून रुग्णवाहिका कुठपर्यंत आली याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. मार्च २०२५ पासून सेवा सुरू होणार आहे.
राज्यभरात १०८ रुग्णवाहिका फार मोलाची भूमिका बजावत आहे. मात्र, बऱ्याचदा १०८ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलविल्यानंतर ती नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, तिला पोहोचायला किती वेळ लागेल हे समजत नाही. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक रुग्णवाहिकेची वाट न पाहता मिळेल त्या वाहनाने रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न करतात. रुग्णांच्या नातेवाइकांचे होणारे हाल लक्षात घेत १०८ रुग्णवाहिका सहज उपलब्ध व्हावी यासाठी मार्च २०२५ पासून मोबाइल अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भविष्यात या अॅपमध्ये खासगी रुग्णालयांचा समावेश करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
चालकाचा, डॉक्टरांचा मिळणार भ्रमणध्वनी
अॅपवरुन रुग्णवाहिका बोलवि- ल्यानंतर तत्काळ चालकाचा किंवा त्यातील डॉक्टरचा भ्रमणध्वनी क्रमांक मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.