साहित्य संमेलनाच्या जेवणावळीचा बेत ठरला; तृणधान्य पदार्थांवर राहणार भर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 10:32 AM2023-01-23T10:32:10+5:302023-01-23T10:52:18+5:30

साहित्यिकांना वर्धेकर करणार तृप्त

The luncheon of the Sahitya Samela was planned; Emphasis will be on cereals | साहित्य संमेलनाच्या जेवणावळीचा बेत ठरला; तृणधान्य पदार्थांवर राहणार भर

साहित्य संमेलनाच्या जेवणावळीचा बेत ठरला; तृणधान्य पदार्थांवर राहणार भर

googlenewsNext

वर्धा : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन वर्धा येथे ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत केले जात आहे. या साहित्य संमेलनासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. यानिमित्त जेवणावळीचा बेतही निश्चित करण्यात आला आहे. २०२३ हे केंद्र सरकारने ‘तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले असल्याने तृणधान्य पदार्थांचा या जेवणावळीत समावेश करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

स्थानिक स्वावलंबी मैदानावर होणाऱ्या या संमेलनाच्या तीन दिवसांच्या जेवणावळीचा कार्यक्रम व मेनू निश्चित करण्यात आला आहे. तीनही दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मेनू ठेवण्यात येणार असून, ३५० नामवंत साहित्यिक, विचारवंत, लेखकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांची भोजन व निवास व्यवस्था आयोजकांकडून केली जाणार आहे. तसेच राज्य व राज्याबाहेरील दोन हजार प्रतिनिधी येथे उपस्थित राहतील. त्यांची ३ ते ५ फेब्रुवारी रात्रीपर्यंत चहा, नाश्ता, भोजन व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी मात्र ४ हजार रुपये प्रती प्रतिनिधी शुल्क आकारले जाणार आहे. संमेलनस्थळी पाच हजार नागरिकांची भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र भोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.

असा असेल भोजनाचा बेत

उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी ३ फेब्रुवारीला सकाळी नाश्त्यात उत्तपम, गार्डन इडली, मैसूर वडा, बनारसी चुरामटर व दालबदाम शिरा राहणार आहे. दुपारच्या जेवणात पनीर अकबरी, व्हेज कोल्हापुरी, दालफ्राय, मिस्सीपुरी, मिस्सीपराठा, स्ट्रॉबेरी रसमलाई, मावावाटी, दहीवडा व कॉर्न कटलेट राहणार असून, रात्रीच्या जेवणात लच्छेदार रबडी, केसरकाॅईन जिलेबी व सीताफळ छेनापाईज हे तीन मिष्ठान्न तसेच अन्य पदार्थांत इंदुरी दहीवडा, मिक्स पकोडे, कढाई पनीर, मेथी मटर मलाई व हैदराबादी वांगे राहणार आहे. शिवाय साेबतीला झुणका, बिस्कीट भाकर, कढी, दाल मखनी, गट्टे पुलाव, वाफवलेला भात, मिनी तंदुरी, फुलका, मिस्सीपुरी व स्टिक मलाई कुल्फी आहे.

दुसऱ्या दिवशी ४ फेब्रुवारीला सकाळी नाश्त्यात इंदोरी पोहा, चना मोट, तिखट चिवडा, मिनी आलुकोफ्ता व व्हेज सॅण्डविच आहे. या दिवशी शनिवार म्हणून उपवास असणाऱ्यांसाठी भगरपुलाव, दही, साबुदाणा वडा, फराळी चिवडा व विलायची केळी असणार आहेत. दुपारच्या जेवणात फ्रुट श्रीखंड, गुलाबजामून, मिश्र दालवडा, मटर कचोरी, मटर पनीर, सावजी कोफ्ता, डाळभाजी, डाळतडका, दमतवा सावजी व फुलके असा बेत आहे.

उपवासास राजगिरा पुरी, आलुशिरा, आलुसाग, फ्रेश फ्रूट, साबुदाणा खिचडी ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या जेवणात पुरणपोळी, केसर रसगुल्ला, व्हेजकटलेट, जोधपुरीवडा, पनीर बटर मसाला, मलाईकोफ्ता, सेवटमाटर, दालजीरा, दालतडका, व्हेज बिर्यानी, फुलका, मिनीतंदुरी, बटर पोळी असे ताट सजणार आहे.

५ फेब्रुवारीला नाश्त्यात ब्रेडरोल, बडवापुरी, आलुकोहळे साग, व्हेज उपमा, चटणी, दिलजानी असा आहार आहे, तर दुपारच्या जेवणात फ्रुट कस्टर्ड, खवापुरी, मिनी मटर काेफ्ता, मद्रासी पकोडा, पनीर पसंदा, काश्मिरी कोफ्ता, डाळयलो, डाळ फंटीयर, वाफवलेला भात, मसाला पुलाव व कढी असा मुख्य बेत आहे. रात्री केसर चमचम, ड्रायफ्रूट हलवा, पंप मटर, सावजी पनीर, मसाला वांगे, आलूमेथी मटर, डाळतडका, स्पेशल पुलाव, फुलका व दोन प्रकारचा पराठा असणार आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला २ फेब्रुवारीला येणाऱ्यांना जिलेबीसह साधे जेवण मिळणार आहे.

Web Title: The luncheon of the Sahitya Samela was planned; Emphasis will be on cereals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.