नोकरीचे आमिष; विवाहितेला पावणेचार लाखांनी गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 06:19 PM2023-02-25T18:19:09+5:302023-02-25T18:20:26+5:30

सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल

The married woman in wardha was duped by four lakhs showing Job lure | नोकरीचे आमिष; विवाहितेला पावणेचार लाखांनी गंडा

नोकरीचे आमिष; विवाहितेला पावणेचार लाखांनी गंडा

googlenewsNext

वर्धा : नोकरीचे आमिष देत विवाहितेकडून वारंवार पैसे उकळवून तब्बल ३ लाख ९५ हजार रुपयांनी विवाहितेची फसवणूक भामट्याने केली. ही घटना सेवाग्राम येथील धन्वंतरी नगरात उघडकीस आली. याप्रकरणी विवाहितेने सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली.

प्राप्त माहितीनुसार, कोमल नामक विवाहितेच्या मोबाइलवर अज्ञात महिलेने मेसेज करून आपण एका कंपनीच्या एचआर विभागातून बोलत असल्याचे सांगितले. नोकरीचे आमिष देत तिच्याकडून विविध टास्क सांगून तीन लाख ९५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले.

सायबर भामट्याने तिला ऑनलाइन जॉबबाबतची माहिती दिली. टेलिग्रॅम नामक ॲप डाऊनलोड करण्यास सांगून विविध अकाऊंटवर पैसे भरण्यास सांगून विवाहितेची तब्बल ३ लाख ९५ हजार रुपयांनी फसवणूक केली. अखेर विवाहितेने याची माहिती सेवाग्राम पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पुढील तपास सेवाग्राम पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: The married woman in wardha was duped by four lakhs showing Job lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.