बुध्दा टेकडी मित्र परिवाराने जागवल्या बाबासाहेबांच्या आगमनाच्या स्मृती

By अभिनय खोपडे | Published: May 1, 2023 04:18 PM2023-05-01T16:18:53+5:302023-05-01T16:19:39+5:30

सेवाग्राम गावातील त्या ऐतिहासिक स्मृतीना दरवर्षी बुध्दा टेकडीच्या वतीने अभिवादन करण्यात येते.

The memory of Babasaheb's arrival was awakened by Budha Tekdi Mitra Parivar | बुध्दा टेकडी मित्र परिवाराने जागवल्या बाबासाहेबांच्या आगमनाच्या स्मृती

बुध्दा टेकडी मित्र परिवाराने जागवल्या बाबासाहेबांच्या आगमनाच्या स्मृती

googlenewsNext

अभिनय खोपडे, वर्धा: डाॕ,बाबासाहेब आंबेडकर , जमनालाल बजाज यांच्या पुढाकाराने १ मे १९३६ ला महात्मा गांधीच्या भेटी करीता सेवाग्रामला आश्रमात आले होते. महात्मा गांधी यांच्या भेटी नंतर संध्याकाळी समाज बांधवांच्या भेटी करीता जुनी वस्ती मध्ये गेले होते, त्यावेळी अशिक्षित, गरीब असलेल्या आपल्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बांधवांकडे त्यावेळी बाबासाहेबाना बसायला साधी खुर्ची सुद्धा नव्हती. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर एका दगडावर बसून त्यांनी समाज बांधवांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, स्वच्छ रहा, मुलांना शिक्षण द्या. भाषा चांगली ठेवा असा महत्वपूर्ण संदेश दिला होता. ज्या दगडावर बसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजबांधवांना संबोधित केले होते. तो दगड सेवाग्राम येथील ग्रामस्थांनी सांभाळून ठेवला असून त्या परिसरात आता भव्य विहार देखील आहे. सेवाग्राम गावातील त्या ऐतिहासिक स्मृतीना दरवर्षी बुध्दा टेकडीच्या वतीने अभिवादन करण्यात येते.

आज सोमवारी १ मे रोजी सकाळी ९ वाजता सेवाग्राम विहारात जावून सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात येऊन अभिवादन सभा घेण्यात आली . यावेळी बुद्ध टेकडी मित्र परिवाराचे सदस्य राजू थुल,प्रकाश कांबळे ,प्रणोज बनकर ,सुनील ढाले,निखिल जवादे ,कवडू दारूंडे आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.

Web Title: The memory of Babasaheb's arrival was awakened by Budha Tekdi Mitra Parivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा