बाजार समितीतील विजयाचा जल्लोष राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आमदाराच्या निवासस्थानी जाऊन केला साजरा

By अभिनय खोपडे | Published: May 1, 2023 04:45 PM2023-05-01T16:45:12+5:302023-05-01T16:46:03+5:30

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलने विजय मिळविला आहे.

The NCP leaders celebrated the victory in the market committee by going to the residence of the BJP MLA | बाजार समितीतील विजयाचा जल्लोष राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आमदाराच्या निवासस्थानी जाऊन केला साजरा

बाजार समितीतील विजयाचा जल्लोष राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आमदाराच्या निवासस्थानी जाऊन केला साजरा

googlenewsNext

हिंगणघाट ( वर्धा) :  वर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक उलाढाल असलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलने विजय मिळविला आहे. या पॅनल मध्ये भाजप- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- शेतकरी संघटना यांचे उमेदवार होते. या विजयाचा जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एडवोकेट सुधीर कोठारी यांनी आमदार समीर कुणावार यांचे निवासस्थानी जाऊन साजरा केला व कुणावार यांचेही अभिनंदन केले.

शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार समीर कुणावार  सहकार नेते, बाजार समितीचे सभापती अॅड.सुधीर कोठारी यांनी शेतकरी संघटना व इतरांना सोबत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे विक्रमी १८ पैकी १७ जागेवर एकतर्फी विजय संपादन करीत बाजार समितीची सत्ता काबीज केली त्या विजयाचा विजयोत्सव आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थानी अॅड.सुधीर कोठारी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी साजरा केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना कुणावार म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज कोठारी यांनी उत्कृष्टपणे सांभाळल्यामुळेच आपल्याला हे यश मिळाले असून यापुढे देखील हिंगणघाट बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचे व त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असणार असून त्यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी मंचावर  सुधीर कोठारी, किशोर दिघे, हिम्मत चतुर,आकाश पोहाणे,संजय डेहणे , वामन चंदनखेडे , प्रफुल्ल बाडे, चंदू मावळे, आशिष पर्बत,अरूण मोटघरे, आफताब खान, महेश झोंटींग, विनोद विटाळे,  अनिता मावळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The NCP leaders celebrated the victory in the market committee by going to the residence of the BJP MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा