भरधाव ट्रक दुभाजकास धडकून जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 17:36 IST2023-06-21T17:35:53+5:302023-06-21T17:36:21+5:30
Wardha News छत्तीसगडवरुन वाळू घेवून यवतमाळ जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रकचे इंजिन गरम आल्याने या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना वर्धा नागपूर मार्गालगत असलेल्या कान्हापूरजवळ मंगळवार (ता. २०) रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली.

भरधाव ट्रक दुभाजकास धडकून जळून खाक
वर्धा : छत्तीसगडवरुन वाळू घेवून यवतमाळ जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रकचे इंजिन गरम आल्याने या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना वर्धा नागपूर मार्गालगत असलेल्या कान्हापूरजवळ मंगळवार (ता. २०) रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. मोबम्मद शरीफ मोहम्मद शफी वय ४६ रा. वाढोना बाजार ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ वाहक सलमान खान हा अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
एमएच ३२ एजे ४४५३ या क्रमांकाचा ट्रक छत्तीसगडवरुन वाळू घेवून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरीता भरधाव वेगात येत होता. दरम्यान कान्हापूरजवळ या ट्रकचे इंजिन गरम होवून त्याने अचानक पेट घेतल्याने चालकाच्या लक्षात येताच ट्रकचालकाने ट्रक थेट रोडच्या बाजूला असलेल्या नाल्याच्या कठड्यावर चढविला. या अपघातात ट्रकचा चेंदामेंदा होवून ट्रक पलटी झाला. मात्र ट्रकने यानंतर चांगलाच पेट घेतल्याने आग नियंत्रणाबाहेर गेल्याने ट्रक जळून खाक झाला.
घटनेच्या एका तासानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तोपर्यंत ट्रक जळून बेचिराख झाला होता. सेलू पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.