वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा टायर फुटला; १५ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2023 22:20 IST2023-04-15T22:20:10+5:302023-04-15T22:20:39+5:30
Wardha News लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्याने ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली. हा अपघात चांदणी फाट्याजवळ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास झाला.

वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा टायर फुटला; १५ प्रवासी जखमी
वर्धा : लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्याने ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली. हा अपघात चांदणी फाट्याजवळ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास झाला. यामध्ये सुमारे १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती खरांगणा पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथून लग्न सोहळा आटोपून वऱ्हाडी मंडळी ट्रॅव्हल्सने देवळी तालुक्यातील काजळी गावाकडे जात होती. भरधाव ट्रॅव्हल्सचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स उलटली. ट्रॅव्हल्समध्ये जवळपास ४० वऱ्हाडी प्रवास करीत होते. यापैकी पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
खरांगना पोलीस अपघात स्थळी दाखल
चांदणी फाट्याजवळ ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची माहिती खरांगना पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व जखमींना तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले तर काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.