दुसरीशी जवळीक ठेवणे गुरुजींना भोवणार; पत्नीने शाळेतच बदडल्याने सर्वत्र खमंग चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 09:08 PM2022-12-31T21:08:04+5:302022-12-31T21:10:02+5:30

आता पूर्वीचेही किस्से येताहेत पुढे...

The wife came to know about the misdeeds of Guruji who was constantly staying away from his wife giving reasons in wardha | दुसरीशी जवळीक ठेवणे गुरुजींना भोवणार; पत्नीने शाळेतच बदडल्याने सर्वत्र खमंग चर्चा

दुसरीशी जवळीक ठेवणे गुरुजींना भोवणार; पत्नीने शाळेतच बदडल्याने सर्वत्र खमंग चर्चा

Next

समुद्रपूर: कोणते न कोणते कारण देत सतत पत्नीपासून लांब राहणाऱ्या गुरुजीच्या गैरकृत्याची भनक पत्नीला लागली. दुसरीशी जवळीक वाढल्याचे निदर्शनास येताच पत्नीने शाळेत जावून पतीराजाला चांगलाच प्रसाद दिला. शाळेत शिक्षक व विद्यार्थी उपस्थित असल्याने या गुरुजीला पळता भुई थोडी झाली होती. या प्रकारामुळे आता तोंड लपवायलाही जागा राहिली नसून दुसरीशी घरठाव चांगलाच भोवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेत हा सर्व प्रकार घडल्याने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेषत: पंचक्रोशीतील गावातही सध्या खमंग चर्चा असून या पराक्रमी गुरुजींचे नाव ऐकताच जुन्या किस्स्यांनाही आता उजाळा मिळायला लागला आहे. यापर्वीही अशाच प्रकरणातन पत्नीने या गुरुजींची धुलाई केल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी हाणामारीचे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. तेव्हा पती-पत्नी एकत्र राहावे, या उद्देशाने पोलिसांनी आपसात समझोता करुन दिला होता. असे वर्तन पुन्हा करणार नाही. 

पत्नीसोबत एकनिष्ठ राहील असे लेखी हमीपत्र गुरुजींनी दिले होते. परंतु गुरुजींना या सर्व बाबींचा विसर पडला आणि पन्हा 'शेपट वाकडे ते वाकडेच' या म्हणी प्रमाणे आणखी एका महिलेशी जवळीक साधली. याची माहिती पत्नीला मिळताच पत्नीचा पारा चढला आणि तिने थेट शाळा गाठून सार्वजनिक ठिकाणी स्त्रीवेड्या पतीचा खरपूस समाचार घेतला. याची चर्चा सुरु असून त्याचे हे कृत्य शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे ठरत असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांत कोणतीही नोंद केलेली नाही.

Web Title: The wife came to know about the misdeeds of Guruji who was constantly staying away from his wife giving reasons in wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक