Wardha | वादाचा वचपा; तलवारीसह दगडाने फोडल्या वाहनाच्या काचा

By चैतन्य जोशी | Published: September 5, 2022 04:31 PM2022-09-05T16:31:26+5:302022-09-05T16:33:35+5:30

ही घटना उमरी मेघे परिसरात घडली.

the windows of the vehicles were broken by stone with sword over old dispute | Wardha | वादाचा वचपा; तलवारीसह दगडाने फोडल्या वाहनाच्या काचा

Wardha | वादाचा वचपा; तलवारीसह दगडाने फोडल्या वाहनाच्या काचा

googlenewsNext

वर्धा : आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढत तिघांनी युवकाची चारचाकी रस्त्यात अडवून तलवारींसह दगडाने चारचाकीच्या काचा फोडून युवकाला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना उमरी मेघे परिसरात घडली. याप्रकरणी ४ रोजी तक्रार दाखल करण्यात आली. तुषार प्रभाकर बदलमवार रा. बेलगाव ह.मु. भाईमारे लेआऊट याचा बंटी राऊत, गोलू खडसे यांच्याशी आठ दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर प्रकरण निवळले होते. मात्र, ३ रोजी रात्रीच्या सुमारास तुषार बादलमवार हा त्याच्या काही मित्रांसह चारचाकीने बेलगाव येथे जात असताना बंटी राऊत, गोलू खडसे दोन्ही रा. रामनगर आणि कृष्णा ठाकरे रा. पालोती यांनी त्याची कार रस्त्यात अडवून तलवार आणि दगडाने चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. इतकेच नव्हे तर शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सावंगी पोलिसात तुषार बादलमवार याने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

Web Title: the windows of the vehicles were broken by stone with sword over old dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.