नाट्य निर्मिती ही सर्व सामान्यासाठी झाली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:09 PM2018-09-10T22:09:43+5:302018-09-10T22:10:03+5:30
बहुदा नाटक हे समाजातील उच्चविद्याविभुषित लोकांच्या घरातील जीवन व घडामोडी यावर लिहिल्या जात आहे. यातून मनोरंजन होत असल्यामुळे पे्रक्षक वर्ग मोठा मिळतो, टाळ्या, प्रोत्साहन मिळून आर्थिक फायदा ही होतो. त्यासाठी नाटयनिर्मिती व सादरीकरण ही उच्चभू्रपेक्षा झोपडीतील लोकांकडून व लोकांसाठी झाली पाहिजे, असे प्रतिपादन नाट्य रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांनी केली वर्धा इप्टा व यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित नाटय चर्चेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बहुदा नाटक हे समाजातील उच्चविद्याविभुषित लोकांच्या घरातील जीवन व घडामोडी यावर लिहिल्या जात आहे. यातून मनोरंजन होत असल्यामुळे पे्रक्षक वर्ग मोठा मिळतो, टाळ्या, प्रोत्साहन मिळून आर्थिक फायदा ही होतो. त्यासाठी नाटयनिर्मिती व सादरीकरण ही उच्चभू्रपेक्षा झोपडीतील लोकांकडून व लोकांसाठी झाली पाहिजे, असे प्रतिपादन नाट्य रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांनी केली वर्धा इप्टा व यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित नाटय चर्चेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
इंडियन पिपल्स थिएटर असोशिएशन (इप्टा) आणि यशवंतराव दाते स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सभागृहात ‘थिएटर आॅफ रिलेवंस या विषयावरील चर्चात्मक व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते तर प्रमुख अतिथी म्हणून रंगकमी डॉ. सतीश पावडे, इप्टा वर्धाचे जिल्हाध्यक्ष राजू बावने, सरचिटणीस डॉ. स्मिता वानखेडे उपस्थित होत्या. तर डॉ. सतीश पावडे म्हणाले की केवळ सिद्धांत मांडून चालणार नाही तर तसे प्रयोगही करावे लागतात. नाट्यलेखकाला समाजाचे दु:ख व अस्वस्थता दिसावी, काहींना जे पटत नाही ते मुळीच स्वीकारु नये, असे जे वागतात प्रसंगी त्यांना शासकीय पद व प्रतिष्ठा लाभत नाही. समाजाचा आशिर्वाद लाभतो, म्हणून समाजांकडून मिळणारे प्रेम हाच खरा पुरस्कार होय. मंजूळ भारद्वाज म्हणाले की, भांडवलशाहीच्या विरोधात जे नाटक निर्माण करतात सादर करतात त्यांचा प्रवास दुखातूनच होतो. काही लोकांसाठी अशी निर्मिती धोकादायक ठरू शकते. परिणामी राजसत्ता ही जावू शकते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र मुंडे यांनी केले. संचालन गौतम पाटील यांनी केले तर आभार जयवंत भालेराव यांनी मानले. यशस्वीतेकरिता रंजना दाते, संगीता इंगळे, सूर्यप्रकाश पांडे, संजय तिळले, चंद्रकांत तिळले, अंकुश डांगे, भूषण भोयर, गजेंद्र सुरकार आदींनी सहकार्य केले.