असा २० प्रकारे होतोय फ्रॉड, एका झटक्यातच होईल तुमचे खाते साफ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 05:31 PM2024-11-12T17:31:41+5:302024-11-12T17:32:30+5:30
Vardha : फसवणूक झाल्यास करा १९३० वर तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव करण्याकरिता सुरक्षितता व उपाय कसे करावेत. मॅट्रोमोनिअल फ्रॉड, केवायसी फ्रॉड, एपीके अॅप्लिकेशन फ्रॉड, ओएलएक्स फ्रॉड, लॉटरी फ्रॉड, लोन फ्रॉड, कस्टमर केअर फ्रॉड, फेक फेसबुक प्रोफाइल, अॅमेझॉन फ्रॉड, कस्टम गिफ्ट फ्रॉड, शेअर मार्केट, ट्रेडिंग फ्रॉड, खोट्या संदेशाद्वारे फसवणूक, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल, सेक्सटॉर्शन, एमएसईबी फ्रॉड, पीएम किसान, लाडकी बहीण योजनेच्या नावाने फसवणूक, ऑनलाइन गेम फ्रॉड, डिजिटल अरेस्ट या ट्रेडिंग फॉड याबाबत नागरिकांची ऑनलाइन फसवणूक झाल्यास टोल फ्री क्रमांक १९३० तसेच cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे
सध्या सायबर फ्रॉडच्या घटना सातत्याने वाढत आहेत. विविध साइट्सवरून फसवणूक केली जात आहे. शेअर ट्रेडिंग, केवायसी अपडेट आदी विविध कारणे सांगून नागरिकांची लूट केली जात आहे. अशा सायबर भामट्यांच्या जाळ्यात उच्च शिक्षितदेखील फसत चालले असल्याने हे रोखण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून अशा फ्रॉडरपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
विविध महाविद्यालयात जनजागृती
सायबर सेल आणि सायबर पोलिस ठाण्यातील पोलिसां- कडून शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्या- लयात सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी नागरिकांची जनजागृती केली जात आहे. इतकेच नव्हे तर नागरिकां- मध्येही जाणीवजागृती करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील असे फ्रॉड दररोज घडत असल्याने यापासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.