तालुक्यात ३५ ग्रामपंचायती झाल्या हागणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:09 PM2017-10-15T23:09:16+5:302017-10-15T23:09:46+5:30
उघड्यावर प्रात:विधीकरिता बसल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांचे सुदृढ आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्यावतीने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : उघड्यावर प्रात:विधीकरिता बसल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांचे सुदृढ आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्यावतीने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून प्रबोधनही केले जात आहे. सध्या तालुक्यातील ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या असून उर्वरित सहा ग्रा.पं. हागणदारीमुक्त करण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे.
तालुक्यातील ४१ ग्रा.पं.पैकी ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तर ६ ग्रा.पं.ची लोटामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सध्यास्थितीत एकूण २६ हजार वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नांना गावकºयांनी प्रतिसाद दिला आहे. शौचालय बांधकामासाठी प्रती लाभार्थी १२ हजार रूपयाचे अनुदान दिल्या जात आहे. यात खड्डा खोदकाम करून बांधकाम करण्यापर्यंत दोन टप्पे आहे. गत तीन वर्षापासून यासाठी सतत परिश्रम घेण्यात येत आहेत. उघड्यावर शौचास बसल्याने गावाचा दर्शनी भाग पूर्णपणे घाणेनी व्यापला जायचा. शिवाय नाकाला रूमाल लावून तितका मार्ग पार करावा लागत असे. उघड्यावर शौचास बसल्यास गावात रोगराईला आमंत्रण मिळत असल्याने शासनाने हागणदारीमुक्त गाव ही मोहीम प्राधान्याने राबविण्याचे निश्चित केले. तालुक्यात डोअर टू डोअर भेटी देवून पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल मरबड व सर्व ग्रामसेवकांनी लोकांना शौचालयाचे महत्व पटवून दिले. त्यांनी गावागावात सभा घेऊन शौचालयाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. त्यांनाही हागणदारीमुक्त गाव ही संकल्पना पटल्याने गावकरी सुद्धा या उपक्रमात सक्रीय झाले. याचाच परिणाम म्हणजे तालुक्यातील ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. कुणी उसनवारीने तर कुणी दागीने गहाण ठेवून शौचालये बांधली. सध्या तालुक्यातील केवळ सहा ग्रा.पं. हागणदारीमुक्त होणे बाकी असून त्यासाठी प्रयत्न सूरू आहे.
सभा घेऊन पटवून दिले शौचालयाचे महत्त्व
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त गाव या उपक्रमांतर्गत प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांनी गावागावात सभा घेऊन शौचालयाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.
गावात उघड्यावर शौचास बसणाºयांना समज देण्यात आली. जनजागृती करून भेटी व सभा घेतल्या. त्यामुळे यश मिळाले आहे. सध्यास्थितीत ३५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
- अनिल मरबड
गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी (श.).