समुद्रपुरात पिण्याचे पाणी नाही

By Admin | Published: May 28, 2017 12:22 AM2017-05-28T00:22:38+5:302017-05-28T00:22:38+5:30

नगर पंचायतच्या लहरी कारभाराने कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरातील तीन प्रभागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे.

There is no drinking water in the sea | समुद्रपुरात पिण्याचे पाणी नाही

समुद्रपुरात पिण्याचे पाणी नाही

googlenewsNext

नागरिकांची भटकंती : टँकरणे पाणी पुरवठ्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : नगर पंचायतच्या लहरी कारभाराने कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरातील तीन प्रभागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे. या प्रभागातील नागरिकांना मागील पाच दिवसांपासून पिण्याचेही पाणी मिळाले नाही. यामुळे नागरिकांची भटकंती होत असून पाण्याकरिता हाहाकार माजला आहे.
चार दशकांपूर्वी बांधलेली येथील पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. तसेच शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. यामुळे अस्तित्त्वात असलेली पाणी पुरविण्याची व्यवस्था तोकडी पडत आहे. यामुळे नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे.
तत्कालीन सरपंच स्व. वसंतराव निखाडे यांनी तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे शासन असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नळ योजना मंजूर करून घेतली; पण त्या योजनेचे पाणी टाकीत पोहोचले नाही. यामुळे येथील स्मशानभूमित एक बोर खोदले. त्याला पाणी लागले. ते पाणी विहिरीत घेत जनतेला पुरविण्यात आले.
ग्रामपंचायतीचे रूपांतर आता नगरपंचायतीत झाले. यामुळे शहराचा विकास होईल, असे वाटत असताना नियोजनाअभावी नागरिकांची पाण्याकरिता होरपळ होत आहे. यावर्षी असलेल्या उष्णतेमुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.
नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांत एकजुटता तसेच कर्मचाऱ्यांवर नसलेल्या वचकाचा परिपाक म्हणून येथील नारिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नळ योजनेची विहीर पूर्ण आटली असून नगर पंचायतने टँकरने पाणी पुरवावे, अशी मागणी या पाचही प्रभागात जोर धरत आहे.

९ मे रोजी झालेल्या मासिक सभेत टँकरने पाणी वाटप करण्याची विरोधी पक्षाची मागणी मान्य केली; पण अद्याप टँकरची व्यवस्था झालेली नाही. नगर पंचायतने त्वरित व्यवस्था करावी.
- मधुकर कामडी, गटनेता.

पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता टँकरकरिता वर्क आॅर्डर दिली आहे. टँकर लवकर येऊन सर्वांना पाणी मिळेल.
- गजानन राऊत, पाणी पुरवठा सभापती, न.पं. समुद्रपूर.

 

Web Title: There is no drinking water in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.