शहरात एकही मोठा उद्योग नाही ही शोकांतिकाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:08 AM2017-10-29T01:08:46+5:302017-10-29T01:09:11+5:30

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड करून १५ वर्षे स्वातंत्र्याचा लढा चालविला.

There is no major industry in the city and no tragedy | शहरात एकही मोठा उद्योग नाही ही शोकांतिकाच

शहरात एकही मोठा उद्योग नाही ही शोकांतिकाच

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास तडस : स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड करून १५ वर्षे स्वातंत्र्याचा लढा चालविला. काँगे्रेसने सहा दशकापेक्षा अधिक काळ सत्ता भोगली; पण आमचा तालुका उपेक्षितच राहिला शहरात एक मोठा उद्योग होता. त्याची मुरमुºयाच्या भावात विक्री करून कामगारांना रस्त्यावर आणले. या शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा, स्मशानभूमीसह तहसीलचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. पुलगाव-आमला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज रेल्वेलाईनमध्ये रुपांतर करण्याचा प्रश्न मार्गी लागला असून त्याचे लवकर काम सुरू होईल, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.
विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेतील स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते. उद्घाटक म्हणून म.रा. सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष शीतल संजय गाते, वर्धा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष केशव दांडेकर, म.रा. सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अजय कडू, जेठानंद राजपूत हिंगणघाट, जयंत तलमले, विजय निवल, संस्थेचे अध्यक्ष सुरेश गणेशपुरे, उपाध्यक्ष प्रदीप पांडे आदी उपस्थित होते.
देशातील सहकार क्षेत्रातील सम्राटांनी सहकार क्षेत्राचा दर्जा उंचविण्यापेक्षा दर्जा घसरविण्याचे काम केले. यामुळे आज देशातील सहकार चळवळ आजारी पडली आहे. सहकार क्षेत्रात कार्य करणारे सहकारी पतसंस्थेतील सभासद, संचालक, कर्मचारी व समाज हे सहकारी पतसंस्थेचे चार खांब आहेत. या चारही खांबांवर पतसंस्थेची इमारत उभी असते. सर्वसामान्य माणूसही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा सहकारी पतसंस्थांकडे अधिक वळतो. सहकारी चळवळ मजबूत करून ती तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार क्षेत्राला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची, त्यांच्या त्यागाची गरज आहे. आजच्या तरूण पिढीने त्यांचे विचार व त्याग आत्मसात करून पतसंस्थांनी खातेदार व सभासदाचा विश्वास संपादन केला पाहिजे, असे मत म.रा. सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.
खा. तडस व ना. चरेगावकर यांचा पतसंस्थेद्वारे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुनीता महिला बचत गट, शोभा महिला बचत गट, अर्चना महिला बचत गट व मीना महिला बचत गटांना खा. तडस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर तडस यांनी स्वामी विवेकानंद वाचनालयासाठी खासदार फंडातून पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर ओक यांनी केले. मान्यवरांचा परिचय अजय बोबडे यांनी करून दिला. वैशाली पोहरे यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन शैलजा सुदाम यांनी केले तर आभर व्यवस्थापक विजय साकरे यांनी मानले. कार्यक्रमालीा अशोक पनपालिया, नितीन बडगे, विरेंद्र धोपाडे, बबन बरवड, डॉ. प्रकाश हणमंते यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Web Title: There is no major industry in the city and no tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.