विश्वनगर मौजातील पांदण रस्ते कधी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:28 AM2018-10-06T00:28:00+5:302018-10-06T00:30:08+5:30
विश्वनगर मौजामधमील पांदण रस्ते गेल्या अनेक वर्षापासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाताना चिखलातून वाट काढावी लागत आहे. याप्रकरणी प्रशासनाला वारंवार निवेदने दिलीत. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : विश्वनगर मौजामधमील पांदण रस्ते गेल्या अनेक वर्षापासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाताना चिखलातून वाट काढावी लागत आहे. याप्रकरणी प्रशासनाला वारंवार निवेदने दिलीत. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या मौजामध्ये १७४५ हेक्टर शेतजमीन आहे. शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी चार पांदण रस्ते आहे. या मार्गावर दररोज प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकरी पेरणीच्या वेळी डोक्यावर खते, बी-बियाणे घेऊन जातात. बैलबंडी सुद्धा जाण्यायोग्य रस्ता नाही. पीक निघाल्यावर कापूस, सोयाबीन, तूर मोठ्या परिश्रमाने पांदण रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आणावे लागतात.
या पांदण रस्त्यांवर अतिक्रमण आहेत. दोन्ही बाजुला झाडझुडूप वाढल्याने मोठा असलेला रस्ता अरूंद झाला आहे. पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महसुल प्रशासनाने कुठलाही पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधूनही याठिकाणी पांदण रस्त्यांवर कुशल व अकुशलस्तरीय कामे झाली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. यावर्षीच्या बजेटमधून चारही पांदण रस्ते नुतनीकरण करण्याची मागणी या मौजातील शेतकऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर पंचयत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.