आजनसरा बॅरेजची प्रतीक्षा कायमच

By Admin | Published: December 29, 2014 02:01 AM2014-12-29T02:01:16+5:302014-12-29T02:01:16+5:30

वर्षानुवर्षे खितपत पडल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही, ही परंपराच जणू वर्धा जिल्ह्याला लाभली आहे़ निम्न वर्धा, लाल नाला या प्रकल्पांतून याचा प्रत्यय आला़

There's always waiting for a badge | आजनसरा बॅरेजची प्रतीक्षा कायमच

आजनसरा बॅरेजची प्रतीक्षा कायमच

googlenewsNext

वर्धा : वर्षानुवर्षे खितपत पडल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही, ही परंपराच जणू वर्धा जिल्ह्याला लाभली आहे़ निम्न वर्धा, लाल नाला या प्रकल्पांतून याचा प्रत्यय आला़ आता आजनसरा बॅरेज उपसा सिंचन प्रकल्पाचेही भिजत घोंगडे कायम आहे़ २००१ मध्ये भूमिपूजन झालेल्या व प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या प्रकल्पाची किंमत वाढतेय; पण प्रकल्पाची प्रतीक्षा संपताना दिसत नाही़
वर्धा नदीवर आजनसरा गावानजीक आजनसरा बॅरेज उपसा सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत नदीच्या पात्रात दगडी बांधकामात बॅरेज प्रस्तावित आहे़ नदीच्या दोन्ही बाजूला मातीचा बंधारा, बॅरेजच्या वरील बाजूस जॅकवेल, रायझिंग मेन, वितरण हौद व दोन मुख्य कालवे प्रस्तावित आहेत. आजनसरा प्रकल्पास १९९६-९७ च्या दरसुचीनुसार १५८ कोटी २१ लाख रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान आहे. मूळ प्रशासकीय मान्यतेनंतर पाच वर्षे निधी प्राप्त झाला नाही़ यामुळे किंमत वाढली़ नव्याने प्रशासकीय मान्यता घ्यावी लागली. या प्रकल्पास राज्य शासनाने २७ नोव्हेंबर २००६ रोजी २००५-०६ च्या दरसुचीनुसार २०८ कोटी ४२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान केली़ या प्रकल्पाचे भूमिपूजन ६ एप्रिल २००१ रोजी पार पडले़
सध्या या प्रकल्पाचा सर्वसाधारण आराखडा प्रदेश कार्यालयाकडून ७ फेबु्रवारी २००८ रोजी मंजूर करण्यात आला़ पंपगृहाचा आराखडा मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिककडून तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ३१.५६ हेक्टर वनजमीन बाधित होते. त्याच्या निर्वनीकरणच्या प्रस्तावास २५ एप्रिल ०६ रोजी केंद्र शासनाकडून तत्वत: मान्यता प्राप्त झाली़ त्यानुसार वन विभागाकडून २८ जानेवारी २०१३ रोजी एनपीव्ही व पर्यायी वनीकरणाकरिता ५८३.६० लाख इतक्या रकमेची सुधारित मागणी प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने २३०.३९ लाख इतक्या रकमेचा भरणा वनखात्यास एप्रिल २०११ मध्ये करण्यात आलेला आहे. उर्वरित ३५२.२१ लाख इतक्या रकमेचा भरणा अद्यापही करावयाचा आहे़ याशिवाय केंद्रीय जल आयोग व पर्यावरणाची परवानगी यासह विविध कारणांमुळे अद्यापही आजनसरा बॅरेजचे काम पूढे सरकलेले नाही़ यामुळे शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाची प्रतीक्षाच करावी लागत आहे़ जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांनी लक्ष घेत प्रकल्पाचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: There's always waiting for a badge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.