‘ते’ झोपडपट्टीवासीय वर्षभरापासून बेघरच
By admin | Published: December 31, 2014 11:29 PM2014-12-31T23:29:22+5:302014-12-31T23:29:22+5:30
हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड परिसरात वसलेल्या नझुलच्या जागेवरील झोपडीधारकांना कायम स्वरूपी पट्टे देण्याची मागणी प्रलंबित आहे. या झोपडपट्टीवर वर्षभरापूर्वी अतिक्रमण हटावची
वर्धा : हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड परिसरात वसलेल्या नझुलच्या जागेवरील झोपडीधारकांना कायम स्वरूपी पट्टे देण्याची मागणी प्रलंबित आहे. या झोपडपट्टीवर वर्षभरापूर्वी अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात आली होती. मात्र यामुळे अनेक कुटुंब बेघर झाली. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शास्त्री वॉर्ड येथे १९८५ पासुन नझुलच्या जागेवर गरीब कुटुंब झोपड्या उभारून वास्तव्य करीत आहेत. हात मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणारी कुटुंबांचा निवासाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे. ११ मे २०१३ ला तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिसांनी जे.सी.बी. लावून संपूर्ण झोपड्या उध्वस्त केल्या. यामुळे येथील गरीब कुटुंबांचे घर उध्वस्त झाले असून संसार उघड्यावर सुरू आहे. उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांना घटनेची माहिती दिली असता त्यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. परंतू या जागेची भू सर्वेक्षण विभागाकडून मोजणी केली आहे. यात सदर जागा नझुलची असल्याचे समजते. अतिक्रमण हटाव घटनेची सर्र्वंकष चौकशी करावी. झोपडपट्टीधारकांना १९९५ च्या कायद्यानुसार पट्टे देण्यात याव, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे.
पोलिसांनी कायदा हातात घेवून झोपड्या उध्वस्त केल्या. मात्र ही कारवाई अविध आहे. याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच दोषींवर कारवाई करून सेवेतून निलंबीत करण्यात यावे, झोपडपट्टी धारकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.(स्थानिक प्रतिनिधी)