उतरलेले ‘ते’ हेलिकॉप्टर सैन दलातील

By admin | Published: May 30, 2017 01:04 AM2017-05-30T01:04:14+5:302017-05-30T01:04:14+5:30

औरंगाबाद वरून नागपूरला जात असलेल्या हेलिकॉप्टरने अचानक आलेल्या वादळात भरकटल्याने ...

The 'they' of the chopped helicopters in the army | उतरलेले ‘ते’ हेलिकॉप्टर सैन दलातील

उतरलेले ‘ते’ हेलिकॉप्टर सैन दलातील

Next

लोकामध्ये भीती अन् कुतूहल : भीतीपोटी अनेकांची धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : औरंगाबाद वरून नागपूरला जात असलेल्या हेलिकॉप्टरने अचानक आलेल्या वादळात भरकटल्याने तालुक्यातील उमरी (जिरा) येथे आकस्मिक लॅन्डींग केली. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीयुक्त कुतूहल निर्माण झाले होते.
रविवारी रात्री १५ आसनी हेलिकॉप्टर औरंगाबादवरून नागपूरला जात होते. हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन सुभेद्रसिंग गुरूदेवसिंग, पायलट गिरीश कांत, श्री.के. मालविया व इंजिनिअर दिनेश्वर कुमार स्वार होते. सदर हेलिकॉप्टर नागपुरात पोहोचण्यापूर्वी आलेल्या वादळाचा जोर पाहता ते उमरी (जिरा) परिसरात उतरविले गेले. हेलिकॉप्टर उतरत असताना पडते की काय अशा भीतीने अनेकांनी घर सोडून पळ काढला. कुणी झाडाखाली लपले. कालांतराने सदर हेलिकॉप्टर सिंधु कांबळे यांच्या पडिक शेतामध्ये उतरले.
हेलिकॉप्टर उतरविण्याची माहिती वर्धा नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच त्यांनी समुद्रपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक आर.बी. भगत घटनास्थळी रवाना झाले.
त्यानंतर मुख्यालयातून सहायक पोलीस निरीक्षक रामसिंग ठाकूर, शिपाई योगेश ब्राह्मणे, गणेश मिसाळ, निलेश चव्हाण यांना बंदोबस्ताकरिता पाठविण्यात आले. पोलीस पोहोचल्यानंतर पायलट, कॅप्टन हे खाजगी वाहनाने नागपूरकडे रवाना झाले.

Web Title: The 'they' of the chopped helicopters in the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.