कुरियर कंपनीचा नोकरच निघाला चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:54 PM2018-03-10T23:54:41+5:302018-03-10T23:54:41+5:30
कुरीयर कंपनीच्या कार्यायाची डुप्लीकेट चाबी बनवून दुकानातून साहित्य लंपास करणाºया नोकरासह त्याच्या सहकाºयाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून चोरीतील ९३ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : कुरीयर कंपनीच्या कार्यायाची डुप्लीकेट चाबी बनवून दुकानातून साहित्य लंपास करणाºया नोकरासह त्याच्या सहकाºयाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून चोरीतील ९३ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भावेश कोरडे (१९) रा. मुर्तिजापूर (तरोडा) ता. तिवसा, जि. अमरावती शुभम सुधीर बोके (२३) रा. आर्वी असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सुत्रानुसार, ११ फेब्रुवारी रोजी आर्वी येथील साईनगर परिसरातील ई-कॉम एक्सप्रेस प्रायव्हेट लिमीटेड या कुरीयर कंपनीत चोरी झाल्याची तक्रार सागर सूर्यकांत मोरे यांनी पोलिसात दिली. चोरट्याने पाच मोबाईल हॅन्डसेट व रोख १ लाख ७ हजार २९१ रुपये व इतर साहित्य चोरल्याचे तक्रारीत नमूद केले होते. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला असता मुर्तिजापूर (तरोडा) येथील भावेश कोरडे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने या कामात त्याला शुभम सुधीर बोके (२३) रा. आर्वी याची मदत मिळाल्याचे सांगितले. शुभम हा याच कुरीयर कंपनीत नोकर आहे. त्याने बनावट चाबी बनवून एक महिन्यापूर्वी ही चोरी केल्याचे सांगितले. यश चोरट्यांकडू पोलिसांनी एकूण ९३ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात उदयसिंग बारवाल, परवेज खान, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळे, आत्माराम भोयर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुने केली.
सुपरवायझर म्हणून बढती नाकारल्याने चोरी
शुभम बोके हा या कुरीयर कंपनीत डिलव्हरी बॉय म्हणून एक वर्षापासून कार्यरत होता. कामादरम्यान त्याने बढती करण्याची मागणी मालकाला केली. यावेळी मालकाने त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत त्याला कामावरून कमी केले. हा राग मनात धरून त्याने कंपनीच्या कार्यालयाची डुप्लीकेट चावी अमरावती येथे बनवून ही चोरी केल्याची कबुली दिली.