चोरटे सक्रीय; वर्धेत दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:08 PM2017-08-26T23:08:11+5:302017-08-26T23:08:46+5:30
रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शुक्रवारी देवळी तालुक्यातील शिरपूर (होरे) येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्या. यापूर्वीही देवळीत चोºया झाल्या. या घटनांमुळे जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाले असल्याचे दिसत असून त्यांना अटक करण्याचे आव्हाण पोलिसांना आले आहे.
पोलीस सुत्रानुसार, धुनिवाले मठ परिसरात डॉ. सम्राट नंदकिशोर तोटे व रत्नाकर धानकुटे यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांचे कुलूप तोडल्याचे समोर आले. यात चोरट्यांनी रोकड लंपास केल्याचे लक्षात येताच त्याची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पपीन रामटेके व नगराळे यांनी चमुसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. येथे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. तर याच वेळी स्थानिक बजाज चौकातून योगेश बाबूलाल पाली यांच्या मालकीची एम.एच. ३२/एन. ४४७८ क्रमांकाची दुचाकी लंपास केली. तिन्ही घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. या संदर्भात पोलिसांचे हात रिकामेच असल्याचे दिसून आले आहे. गत काही दिवसापांसून जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे. देवळीत उच्छाद घालणाºया चोरट्यांकडून आता वर्धेत चोºया केल्याचा आरोप होत आहे. या चोरट्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
पंचनामा करूनही सुगावा मिळत नाही
देवळी तालुक्यातील शिरपूर (होरे) येथे एकाच दिवशी पाच घरे फोडण्यात आली. यात सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र चोरट्यांचा कुठलाही सुगावा त्यांच्या हाती लागला नाही. या पाच चोºयांपूर्वी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच भागात सतत तीन दिवस चोºया झाल्या. त्याचा छडा लावण्याकरिता पोलिसांना महिन्याचा कालावधी लागला होता. आता या चोºयांचा शोध लावण्यात आणखी किती दिवस लागेल, असा सवाल नागरिक करीत आहेत.
पोलिसांचा अभ्यास कमी, की चोरटे हुशार
चोºयांची माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळ गाठण्यात येते. देवळी आणि वर्धेत तसेच झाले. मात्र पंचनामा करणाºया पोलिसांच्या हाती काहीच आले नसल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांच्या शोधाकरिता श्वान पथकाला व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या हातीही काहीच आले नाही. यामुळे पोलिसांचा चोºयांच्या तपासात अभ्यास कमी पडतो की चोरटे अधिक हुशार झाले, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
जिल्हा पोलिसांनी ज्या चोºया पकडल्या त्यात मोबाईल लंपास झाल्याचे समोर येत आहे. यामुळे आता पोलीस केवळ मोबाईलच्या आधारावरच चोर पकडण्यात यशस्वी होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांनकडून होत असल्याचे दिसत आहे.
पोलिसांचे लक्ष दारू अन् जुगारावरच
जिल्ह्याच्या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून केवळ दारू आणि जुगाराच्या गुन्ह्यावरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून सध्या दारू आणि जुगाºयांवरच कारवाई होत असल्याचे दिसून आले आहे.