मेडिकल्ससह ज्वेलरी शॉपला चोरट्याने केले टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 05:00 AM2021-07-10T05:00:00+5:302021-07-10T05:00:15+5:30

ज्वेलरीच्या दुकानातून चोरट्यांनी तीन लाखाचा तर मेडिकल्स शॉपमधून पाच हजाराचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. ऐन बाजार ओळीतील दुकानांमध्ये चोरी झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस येताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करीत पंचनामा केला.

Thieves target jewelery shop with medicals | मेडिकल्ससह ज्वेलरी शॉपला चोरट्याने केले टार्गेट

मेडिकल्ससह ज्वेलरी शॉपला चोरट्याने केले टार्गेट

Next
ठळक मुद्दे३.०५ लाखाचा मुद्देमाल लंपास : वडनेर गावासह परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
वडनेर :  येथील एका ज्वेलरी शॉपसह मेडिकल्सला चोरट्याने टार्गेट करून या दोन्ही दुकानांमधून तीन लाख पाच हजाराचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे गाव व परिसरात चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक बाजारपेठेतील गुरुश्री ज्वेलर्स तसेच श्रीराम मेडिकल्स या दोन दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. ज्वेलरीच्या दुकानातून चोरट्यांनी तीन लाखाचा तर मेडिकल्स शॉपमधून पाच हजाराचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. ऐन बाजार ओळीतील दुकानांमध्ये चोरी झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस येताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करीत पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात  पोलीस उपनिरीक्षक सोनपितळे करीत आहेत. चोरट्यांच्या शोधार्थ वडनेर पोलिसांच्या सुमारे तीन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. लवकरच चोरट्यांना जेरबंद करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून असा विश्वास सध्या पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

हिंगणी-घोराड मार्गावर धाडसी घरफोडी
सेलू (घोराड) : कुलूपबंद घराला टार्गेट करून घरातील तीन हजार रुपये चोरून नेण्यात आले. ही घटना हिंगणी-घोराड मार्गावरील दीपक आनंद झोरे यांच्या घरी घडली. दीपक झोरे यांचे घोराड शिवारात हिंगणी मार्गावर घर आहे. त्यांच्या शेजारी दीपक यांचे बंधू तुळशीराम झोरे राहत असून, ते दवाखान्यात गेले होते तर दीपक हे ब्राम्हणी येथील शेतात गेल्याने घराला कुलूप होते. याच संधीचे सोने करीत चोरट्याने भरदुपारी दीपक यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील तीन हजार रुपये चोरून नेले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. दीपक हे घरी परतल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच सेलू पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: Thieves target jewelery shop with medicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर