वर्धा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री सात घरे टार्गेट; खरांगणा पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 04:13 PM2022-05-06T16:13:46+5:302022-05-06T16:52:28+5:30

एकाच रात्री तब्बल सात घरांना चोरट्यांनी टार्गेट केल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

Thieves terrorize Anji area, target seven houses in one night; Kharangana police squad on the trail of the accused | वर्धा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री सात घरे टार्गेट; खरांगणा पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर

वर्धा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री सात घरे टार्गेट; खरांगणा पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर

googlenewsNext
ठळक मुद्देआंजी परिसरात चोरट्यांची दहशतखरांगणा पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर

आंजी (वर्धा) : जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरापासून अवघ्या १७ किमी अंतरावर असलेल्या आंजी (मोठी) येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सात बंद घरांना टार्गेट केले. चोरट्यांना या ठिकाणी मोठा मुद्देमाल मिळाला नसला तरी या घटनेमुळे आंजी (मोठी) परिसरात चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

आंजी (मोठी) येथील गुप्ता ले-आऊट, इंदिरानगर, मास्टर कॉलनी, बाजार चौक तसेच वॉर्ड क्रमांक ४ मधील एकूण सात घरांना चोरट्यांनी टार्गेट केल्याची माहिती मिळताच खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सानप, कामडी, गिरीश चंदनखेडे त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरट्यांनी टार्गेट केलेल्या घरांसह परिसराची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी खरांगणा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठसेतज्ज्ञांसह श्वान पथकाला पाचारण

एकाच गावातील एकाच रात्री तब्बल सात घरांना चोरट्यांनी टार्गेट केल्याची माहिती मिळताच ठसेतज्ज्ञांसह श्वान पथकाने तातडीने आंजी (मोठी) गाव गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या ठसेतज्ज्ञांनी आरोपींबाबत काही सुगावा मिळतो काय याची शहानिशा केली, तर श्वान पथकाने चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी

एकाच रात्री तब्बल सात घरांना चोरट्यांनी टार्गेट केल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. नागरिकांची गर्दी बाजूला सारून पोलिसांनी चोरट्यांबाबत अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सात घरांची फोडली कुलूप

अज्ञात चोरट्यांनी आंजी (मोठी) येथील वाॅर्ड क्र. १ मधील गुप्ता ले-आऊटमधील दिवाकर गायकवाड, इंदिरानगर येथील सैयद नूर अली मजर अली, मास्टर कॉलनीतील अशोक बिसे, डॉ. प्रमोद लोहकरे, वॉर्ड क्र. २ भागातील बाजार चौकातील महेबूब इस्माइल शेख, वाॅर्ड क्र. ३ मधील महेश सुरेश दांडेकर, वाॅर्ड क्र. ४ मधील सुदाम महाजन यांच्या मालकीच्या घरांचे कुलूप तोडले. सातपैकी केवळ दोनच ठिकाणी चोरट्यांच्या हाती मुद्देमाल लागला.

प्रकृती बरी नसल्याने मेहबूब गेले होते नातेवाइकांकडे

मेहबूब इस्माइल शेख घरी एकटे असल्याने तसेच प्रकृती ठीक नसल्याने ते नातेवाइकाकडे झोपायला गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील रोख चार हजार रुपये, आठ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या तोरड्या, एक सोनपोत तर महेश दांडेकर यांच्या घरातून रोख १ हजार ५०० रुपये चोरून नेले.

लाइटऐवजी दाबली बेलचे बटन

सुदाम महाजन यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने प्रवेश मिळविताना चोरट्यांपैकी एकाने लाइटऐवजी डोअर बेलचे बटन दाबले. त्यामुळे घरातील वरच्या खोलीत झोपून असलेले सुदाम महाजन हे जागे झाले. घरात कुणीतरी असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी येथून यशस्वी पळ काढला.

सकाळी उठल्यावर निदर्शनास आला चोरीचा प्रकार

महेश दांडेकर हे घराला कुलूप लावून स्लॅबवर झोपले होते. ते शुक्रवारी सकाळी उठून घरात प्रवेश करणार तर घराचे दार उघडे असल्याचे त्यांना दिसून आले. बारकाईने पाहणी केली असता पॅन्टच्या खिशातील १ हजार ५०० रुपये चोरी गेल्याचे निदर्शनास आले, तर घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या दिवाकर गायकवाड, डॉ. प्रमोद लोहकरे, अशोक भिसे, सैयद नूर अली यांच्या घराला चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात कुणी नसल्याची संधी साधून टार्गेट केले.

सीसीटीव्हीत झाले कैद

आंजी (मोठी) येथील तब्बल सात घरांना टार्गेट करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हेच सीसीटीव्ही चित्रीकरण शुक्रवारी सकाळी पोलिसांनी बारकाईने तपासले. या चित्रीकरणातून मोठी महत्त्वाचीच माहिती खरांगणा पोलिसांच्या हाती लागली असून, लवकरच या चोरट्यांना जेरबंद करू असा विश्वास खरांगणा पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Thieves terrorize Anji area, target seven houses in one night; Kharangana police squad on the trail of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.