इयत्ता तिसरीत त्याने केली भगवद् गीता मुखपाठ

By admin | Published: May 11, 2014 12:33 AM2014-05-11T00:33:06+5:302014-05-11T00:33:06+5:30

वय वर्षे आठ. असे असले तरी संस्कृतमधील श्लोकांचे तो अस्खलीतपणे उच्चारण करतो. एव्हाना हे श्लोक त्याला मुखपाठ आहे.

In the third grade he wrote the Bhagavad Gita maintext | इयत्ता तिसरीत त्याने केली भगवद् गीता मुखपाठ

इयत्ता तिसरीत त्याने केली भगवद् गीता मुखपाठ

Next

वायगाव (नि.) : वय वर्षे आठ. असे असले तरी संस्कृतमधील श्लोकांचे तो अस्खलीतपणे उच्चारण करतो. एव्हाना हे श्लोक त्याला मुखपाठ आहे. भगवद् गीतेतील सर्व अठरा अध्याय त्याने पाठांतर केले. याकरिता चक्रधर प्रेमराज काळे याचे गाव परिसरात कौतुक केले जाते. येथील अंकुर सिड्स कंपनीच्या वसाहतीत वास्तव्य करणार्‍या काळे परिवारातील इयत्ता तिसरीत शिकत असलेला चक्रधर हा आठ वर्षीय मुलगा सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थी आहे. त्याने संस्कृतमधील श्रीमद् भगवद् गीतेतील पुर्ण १८ अध्याय मुखपाठ केले आहे आहे. काही श्लोकांचा अर्थ तो सांगतो. गीतेतील एकुण अध्यायापैकी १५ वा अध्याय सर्वात मोठा अध्याय आहे. त्यात सर्वाधिक श्लोक आहे. तो अध्याय चक्रधर न अडखळता पुर्ण करतो. याशिवाय संस्कृतमधील दत्तात्रेय कवच त्याने मुखद्गत केले. चक्रधरने एवढ्या लहान वयात सर्व श्लोक मुखपाठा केल्याबद्दल त्याचे अनेक संस्थांनी कौतुक केले आहे. तसेच परीसरातील नागरिकांकरिता तो आश्चर्याचा विषय आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारा मुलगा त्याला संस्कृतमधील श्रीमद्् भगवद् गीता व दत्ताचेकवच मुखपाठ असने विशेष बाब आहे. अनेकांना संस्कृतमधील श्लोक वाचणे तर सोडा त्याचे उच्चारण कठीण असते. त्याने यापूर्वी काही स्पर्धात भाग घेउन बक्षीस प्राप्त केले आहे. त्याच्या पालकाला विचारणा केली असता त्याला वाचन व पाठांतराची आवड असल्याने त्याने गीतेतील श्लोक पाठ करण्याचा सपाटा लावला. त्याचा तो छंद झाला आहे. (वार्ताहर) भागवत कार्यक्रमालाही उपस्थिती गत एक वर्षापासून तो नियमित गीता वाचन करीत आहे. शिवाय त्याला संस्कृत वाचण्याची आवड असल्याचे त्याचे पालक सांगतात. तो परीसरातील भागवत कथा प्रवचनाला उपस्थित असतो. कीर्तनकार बबन पांडे यांनी त्याचे कौतुक करीत त्याला कार्यक्रमात सन्मानित केले. त्याच्यातील या विलक्षण गुणवत्तेचे कौतुक होते.

Web Title: In the third grade he wrote the Bhagavad Gita maintext

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.