दिंदोडा बॅरेजविरूद्ध ठिय्या आंदोलन

By Admin | Published: March 24, 2017 01:57 AM2017-03-24T01:57:10+5:302017-03-24T01:57:10+5:30

जलसंधारण विभाग व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ चंद्रपूरमार्फत प्रस्तावित दिंदोडा बॅरेज प्रकल्पासाठी

Thiya agitation against Dindoda Barrage | दिंदोडा बॅरेजविरूद्ध ठिय्या आंदोलन

दिंदोडा बॅरेजविरूद्ध ठिय्या आंदोलन

googlenewsNext

शेतकरी, ग्रामस्थांचा विरोध : अल्प मोबदला देत घेतल्या जमिनी
हिंगणघाट : जलसंधारण विभाग व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ चंद्रपूरमार्फत प्रस्तावित दिंदोडा बॅरेज प्रकल्पासाठी १९९७-९८ मध्ये जमिनी संपादित केल्या. १९९९-२००० मध्ये यापोटी अत्यल्प मोबदला देण्यात आला; पण प्रकल्पाचे काम न झाल्याने त्या जमिनींवर शेतकऱ्यांचा ताबा आहे. या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात याव्या, या मागणीसाठी मंगळवारी प्रकल्पस्थळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दिंदोडा बॅरेजकरिता संपादित शेत जमिनीवर शेतकरी शेती करीत आहे. या जमिनीवर शेतकऱ्यांचाच ताबा आहे. सदर शेतजमिन संपादित करताना निपॉन डेन्रो या खासगी कपंनीने घेतली होती. तो निपॉन डेन्रो प्रकल्प बारगळल्याने ही जमीन शासनाने परस्पर पाटबंधारे विभागाला हस्तांतरीत केली. आता शासन दिंदोडा बॅरेज प्रकल्पाच्या निर्मितीचा घाट घालत आहे. औद्योगिक वापरासाठी पाणी मिहावे या उद्देशाने बॅरेजची निर्मिती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या मते, नमूद प्रकल्पासाठी २० वर्षांपूर्वी अत्यंत कमी दरामध्ये जमीन संपादित करण्यात आली होती. पुर्वजांनी आम्हाला या प्रकल्पापासून फायदा होईल, अशी आशा दाखविली होती. यावरूनच शासनाच्या कामांत मदत केली होती; पण या जमिनीवर प्रकल्प उभा झाला नाही. यात शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ही जमीन प्रकल्पबाधीत शेतकरी वाहत असून ती त्यांच्या ताब्यात आहे. यामुळे भूमी अधिग्रहण कायदा २०१३-१४ (कलम २४-२) नुसार १९९९-२००० मध्ये झालेले अधिग्रहण रद्द होण्यास पात्र आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर संस्थेने ज्या प्रयोजनार्थ जमीन संपादित केली आहे त्या कामाकरिता पाच वर्षेपर्यंत वापरली गेली नाही तर ती जमीन शेतकऱ्याला परत करावी, असे कलम २४-२ मध्ये स्पष्टपणे नमूद आहे.
यामुळे सदर जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्या, अशी माणगी करण्यात येत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रकल्प बाधितांनी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची स्थापना केली. समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे असून त्यांच्या नेतृत्वात मंगळवरी प्रकल्पस्थळी एकदिवसीय ठिय्या व धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे अनुयायी विलास भोंगाडे तसेच समीक्षा गणवीर यांची उपस्थिती होती. मेधा पाटकर यांनी आंदोलनच्या दिवशी दूरध्वनीवरून दुपारी २ वाजता पाठींबा दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा तिजारे यांनी दिला. शासनाचा कोणताही प्रतिनिधी आंदोलनस्थळी निवेदन घेण्यास न आल्याने शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
आंदोलनात डॉ. विजय देवतळे, समितीचे उपाध्यक्ष अभिजीत मांडेकर, सचिव चंफत साळवे, कोषाध्यक्ष भिडकर, मनोज कोसुरकार, प्रकाश मुथा, गिरडकर, भेदुरकर, रामदास ठोंबरे, मनोज तेलंग, बोंडे आदी सहभागी झाले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Thiya agitation against Dindoda Barrage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.