‘त्या’ वाघिणीचे बछड्यांंसह ‘चला परत फिरा रे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:31 PM2018-08-30T22:31:53+5:302018-08-30T22:32:18+5:30
तालुक्यातील गिरड सहवन परिक्षेत्रातील शिवणफळ जंगलातून शेतशिवारात मुक्त वावरणारी वाघीण आपल्या दोन बछडयासह परत स्वगृही आली आहे. तब्बल एक महिन्यानंतर ती परतल्याची माहिती आज वनविभागाकडून देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील गिरड सहवन परिक्षेत्रातील शिवणफळ जंगलातून शेतशिवारात मुक्त वावरणारी वाघीण आपल्या दोन बछडयासह परत स्वगृही आली आहे. तब्बल एक महिन्यानंतर ती परतल्याची माहिती आज वनविभागाकडून देण्यात आली.
खुर्सापार जंगलातील कक्ष क्रमांक ३१६ मध्ये मंगळवारी सकाळीगस्तीवर असताना वनरक्षक वैशाली डोंगे ,सहाय्यक वनरक्षक अमृत आखूड यांना दोन बछडयासह वाघीण आढळून आली. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवणफळ जंगलातून भ्रमंती करीत निघालेल्या या वाघिणीने उंदीरगाव, अंतरगाव, सावंगी, धोंडगांव शिवारात जनावरांचा फडशा पाडला. शेतशिवारात या वाघिणीचा मुक्तसंचार असल्याने शेतकरी व शेतमजुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वनविभागाने गस्ती पथक तयार करून वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते. शनिवार १८ आॅगस्ट रोजी ही वाघीण अंतरगाव शिवारात वास्तव्यास होती. यानंतर या वाघिणीच्या वास्तव्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. सध्या ही वाघीण आपल्या दोन बछडयासह तब्बल एका महिण्यानंतर खुर्सापार जंगलात परतली आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांंची वाघिणीच्या भीतीपासून सुटका झाली आहे.