साडेसहा हजारावर मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:23 PM2019-05-24T22:23:50+5:302019-05-24T22:24:31+5:30

लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघातून १४ उमेदवार रिंगणात होते. मतपत्रिकेवर १५ क्रमांकावर ‘नोटा’ हा पर्याय असल्याने तब्बल ६ हजार ५१० मतदारांनी या १४ ही उमेदवारांना नाकारुन ‘नोटा’ची बटन दाबली.

Thousands and thousands of voters rejected all the candidates | साडेसहा हजारावर मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारले

साडेसहा हजारावर मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारले

Next
ठळक मुद्देअपक्ष उमेदवारांच्या मतापेक्षा ‘नोटा’ ची आघाडी : धामणगाव मतदारसंघात सर्वाधिक मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघातून १४ उमेदवार रिंगणात होते. मतपत्रिकेवर १५ क्रमांकावर ‘नोटा’ हा पर्याय असल्याने तब्बल ६ हजार ५१० मतदारांनी या १४ ही उमेदवारांना नाकारुन ‘नोटा’ची बटन दाबली. विशेषत: भाजप, काँग्रेस, बसपा व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला वगळता एकाही उमेदवाराला ‘नोटा’ इतके मताधिक्य मिळविता आले नाही.
वर्धा लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, बसपा, वंचित बहूजन आघाडी, आंबेडकराईट पार्टी, रिपब्लीकन पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, लोकजागर पार्टी यांच्यासह सहा अपक्ष उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीदरम्यान मतदार संघातील १७ लाख ४१ हजार मतदारांपैकी १० लाख ७२ हजार ६५७ मतदारांनी आपला हक्क बजाविला. यापैकी १० लाख ६७ हजार १५८ मतदारांनी मशीनव्दारे मतदान केले. तर ५ हजार ४९९ मतदारांनी पोस्टल बॅलेटव्दारे मत नोदविले. या एकूण मतदानातून तब्बल ६ हजार ५१० मतदारांनी नोटाची बटन दाबून सर्व उमेदवारांप्रती नाराजी व्यक्त केली. या नोटांच्या मतापैकी ६ हजार ४०२ मतदान हे मशीनव्दारे करण्यात आले आहे. यापैकी धामणगाव विधानसभा मतदार संघात नोटाला सर्वाधिक तर देवळी मतदार संघात सर्वात कमी मतदान झाले. नोटाच्या मतामध्ये होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे.

पोस्टल मतदानातुनही नोटाला पसंती
या लोकसभा निवडणुकीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह सैन्यदलात काम करणाऱ्यांनी पोस्टल व्दारे मतदान केले. पोस्टलव्दारे एकूण ५ हजार ४९९ मतपत्रिका प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८७ मत अवैध ठरले. इतकेच नाही तर या पोस्टल मतदानामध्ये १०८ मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. त्यामुळे पोस्टलव्दारे ५ हजार ३०४ मते वैध ठरले आहे.

पोस्टलमधून सर्वांनाच मत ‘दान’
पोस्टलव्दारे मतदान करुन मतदारांनी सर्व १४ उमेदवारांच्या पारड्यात काही ना काही मतदान टाकले. वैध ठरलेल्या ५ हजार ३०४ मतांपैकी सर्वाधिक २ हजार ८७६ मते भाजपाचे रामदास तडस तर १ हजार ९३० मते काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना मिळाली. त्यानंतर उर्वरित उमेदवारांना फुल ना फुलाची पाकळी देत सर्वांनाच खुश केले.
यंदा मागील निवडणुकीच्या तुलनेत नोटाचा वापर दुपट्टीनेच वाढला आहे. तसेच पोस्टल बॅलेट पद्धतीनेही मतदान करणारे वाढल्याचे दिसते. असे असले तरी नोटाच्या वापरात होणारी वाढ चिंतेचीच ठरत आहे.

Web Title: Thousands and thousands of voters rejected all the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.