दारूविक्रेत्यांकडून जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:58 PM2019-01-27T23:58:52+5:302019-01-27T23:59:21+5:30

सेलू तालुक्यातील सुकळी (स्टेशन) येथील दारूबंदी महिला मंडळाने दारू पकडून नष्ट केली.त्यामुळे संतापलेल्या दारूविक्रेत्यांनी महिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. येथील पोलिसही दारूविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप केला आहे. तसेच योग्य कारवाई करण्याची मागणी, दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

The threat of death by liquor vendors | दारूविक्रेत्यांकडून जीवे मारण्याची धमकी

दारूविक्रेत्यांकडून जीवे मारण्याची धमकी

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला मंडळाचे आमदारांना निवेदन : पोलीसही विक्रेत्यांच्या पाठीशी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू तालुक्यातील सुकळी (स्टेशन) येथील दारूबंदी महिला मंडळाने दारू पकडून नष्ट केली.त्यामुळे संतापलेल्या दारूविक्रेत्यांनी महिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. येथील पोलिसही दारूविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप केला आहे. तसेच योग्य कारवाई करण्याची मागणी, दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सुकळी (स्टेशन) येथील दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांनी आमदार भोयर यांच्या निवासस्थानी भेट देवून दारूविक्रेते आणि पोलिसांच्या संगणमताचा उलगडा केला. गावातील प्रवीण थुल नामक दारू विक्रेत्याची दारू स्मशानभूमी लगतच्या नाल्यात असल्याची माहिती मिळताच महिला मंडळानी शुक्रवारी ती नष्ट केली. तसेच शहापूर शिवारातीलही दारूसाठा नष्ट केला. तसेच सोमवारी प्रशांत सोनटक्के नामक दारूविक्रेत्याचाही गावठी दारूसाठा नष्ट केला. गावात मागील तीन वर्षापासुन प्रवीण थुल, राजु राऊत उर्फ ठेपणी, प्रफुल थुल, प्रशांत सोनटक्के व संजय सहारे हे दारूचा व्यवसाय करतात. यासर्वांनी एकत्र येवून आता महिला मंडळाच्या सदस्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याबद्दल सेलू पोलिसांना कळविल्यावर पोलिसांकडूनही सहकार्य मिळण्याएवजी दारू विक्रेत्यांची पाठराखन केली जात असल्याचा आरोप अंजना सयाम, ताईबाई शेंद्रे, सुशील कुमरे, पुष्पा दुधकोहळे, प्रेमिला कुमरे, तिरूणी टेंभरे, शिला जुगनाके, इंदू वरकट यांनी निवेदनातून केला असून या दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सुकळी (स्टेशन) येथील दारूबंदी महिला मंडळानी निवेदन दिले असुन यागावातील दारूविक्रेंत्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सुचना सेलूचे ठाणेदार काटकर यांना केल्या आहे. तसेच पोलीस अधिक्षकांना महिला मंडळाच्या निवेदनासह पत्रही पाठविले आहे.
- डॉ.पंकज भोयर, आमदार

Web Title: The threat of death by liquor vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.