भ्रष्टाचाराच्या चौकशीमुळेच कर्मचाºयांची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:52 PM2017-09-14T23:52:06+5:302017-09-14T23:52:18+5:30
११ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत विविध विभागातील बदल्या करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : ११ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत विविध विभागातील बदल्या करण्याचा ठराव पारित करण्यात आला. याचा राग म्हणून बुधवारी सकाळी ११ वाजता मुख्याधिकाºयांनी सुचविल्या प्रमाणे भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. ती चौकशी पूर्ण होवू नये म्हणून न.प. कर्मचारी संजय अंभोरे व महेंद्र शिंगाणे यांनी सदस्यांना व महिला उपमुख्यधिकाºयांना जिवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती आर्वीचे नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिली आहे.
आर्वी नगर पालिकेत भाजपला सत्ता मिळाल्यानंतर दोन महिणे नगर पालिकाअंतर्गत शहरातील साफ सफाईची कामे सुरळीत सुरू होती. परंतु कामचुकार, भ्रष्ट कर्मचाºयावर पदाधिकाºयाची पकड मजबूत होत आहे. हे लक्षात आल्यावर कर्मचाºयांकडून कामात असहकार करण्याची व कमी काम करण्याची भूमिका घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आर्वी शहरातील अनेक वॉर्डात नागरिकांच्या घरासमोरील नाल्यांची सफाई न होणे व रस्त्याची साफ-सफाई न झाल्याने नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. यावर बारकाईने लक्ष दिले असता कर्मचाºयांकडून जाणून बुजुन हा प्रकार होत असल्याचे लक्षात आले.
कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष, सभापती व नगरसेवक यांनी केला. बुधवारी शिपाई संजय अंभोरे व जमादार महेंद्र शिंगाणे यांनी सदस्य व महिला उपमुख्याधिकारी यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुख्याधिकारी यांना फोन करून माहिती देण्यात आली. ते या संदर्भात निर्णय घेणार होते. ती कारवाई पूर्ण होण्याच्यापूर्वीच सफाई कामगार संघटनेच्या दोनही पदाधिकारी यांनी नगरसेवक कैलास गळहाट व अन्य एकासोबत मारपीट केली.
उपविभागीय अधिकारी आर्वी व आर्वी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. त्यात २५ नगरसेवकांच्या स्वाक्षºया आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे नगर पालिका कर्मचारी संघटनेकडून आरोग्य सभापती यांनी संजय अंभोरे यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती आहे.