सरपंचाला धमकी; सदस्य एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:02 PM2018-08-20T23:02:01+5:302018-08-20T23:03:11+5:30
शहरातील शिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंतच्या सिमेंटीकरणाच्या कामाबाबत ग्रामपंचायत पिपरी (मेघे) कडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील शिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंतच्या सिमेंटीकरणाच्या कामाबाबत ग्रामपंचायत पिपरी (मेघे) कडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. त्यामुळे सरपंच अजय गौळकर हे ग्रामपंचायत सदस्य आणि बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह कामाची पाहणी करण्यासाठी गेले. तेव्हा सदोष काम आढळून आल्याने काम बंद करायला लावले. यामुळे संतापलेल्या कंत्राटदाराने लगेच संरपचासोबत भ्रमणध्वनीवरुन संपर्कसाधून धमकी दिली. याप्रकरणी सरपंचाच्या तक्रारीवरुन कंत्राटदार माया तिवारी यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंतच्या सिमेंटीकरणाचा कंत्राट जे.पी.कंन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडून सदर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यामुळे सरपंच गौळकर हे ग्सदस्यांसह रस्त्यावर गेले. सरपंचाने उपअभियंता मंत्री यांना बोलविले असता त्यांनी उपस्थित नसल्याचे सांगितल्याने शाखा अभियंता हातमोडे यांना बोलावून कामाची पाहणी केली.त्यावेळी या कामात अनेक त्रुट्या आढळून आल्या. याबाबत शाखा अभियंता हातमोडे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तर दिले. त्यामुळे उपअभियंता मंत्री यांना भ्रमध्वनीवर संपर्क साधून विचापूस केली असता त्यांनी काम बंद करतो आणि मी स्वत: येऊन चौकशी करतो असे आश्वासन दिले. काम बंद केल्याने संतापलेला कंत्राटदार माया तिवारी याने भ्रमणध्वनीवरुन धमकी दिली. असे सरपंचाने तक्रारीत नमुद केले आहे. रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन कं त्राटदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे ग्रामपंचायत व पंचायत समिती सदस्यांनी एकत्र येऊन ग्रामसभा घेतली. त्यानंतर सर्व सदस्यांनी आज जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन दिले.यावेळी सरपंच गौळकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य राजेश राजुरकर, प्रफुल्ल मोरे, उपसरपंच शेषराव मुंगले, सदस्य सिमा दोडके,भारती गाडेकर, पंकज उजवणे, दीपमाला राजुरकर, प्रशांत खंडारे, मनीष मसराम, दिक्षा जीवने, ज्योती वाघाडे, नलिनी परचाकी, शुभांगी पोहाणे, गजानन वानखेडे, वैभव चाफले,कुमूद लाजुरकर, सुधीर वसू, विद्या कळसाईत व सुरेंद्र झाडे यांची उपस्थिती होती.