चोरट्यांनी फोडली तीन घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:12 PM2019-02-25T22:12:08+5:302019-02-25T22:12:20+5:30

परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी शहरानजीकच्या पिपरी (मेघे) भागातील राममुर्ती वैद्य ले-आऊट येथील दोन घर तर गोपालनगर येथील एका घराला टार्गेट केल्याने परिसरात चोरट्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी वैद्य ले-आऊट भागातील एका घरात व गोपाल नगरातील एका घरात आपले काम फत्ते केले. परंतु, घर मालक बाहेर गावी असल्याने चोरट्यांनी किती मुद्देमाल लंपास केला हे सायंकाळी उशीरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.

Three houses scattered by thieves | चोरट्यांनी फोडली तीन घरे

चोरट्यांनी फोडली तीन घरे

Next
ठळक मुद्देपिपरी (मेघे) परिसरात दहशत : रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी शहरानजीकच्या पिपरी (मेघे) भागातील राममुर्ती वैद्य ले-आऊट येथील दोन घर तर गोपालनगर येथील एका घराला टार्गेट केल्याने परिसरात चोरट्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी वैद्य ले-आऊट भागातील एका घरात व गोपाल नगरातील एका घरात आपले काम फत्ते केले. परंतु, घर मालक बाहेर गावी असल्याने चोरट्यांनी किती मुद्देमाल लंपास केला हे सायंकाळी उशीरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.
चोरट्यांनी संधी साधून कारला चौक भागातील गोपालनगर येथील देवराव विठ्ठल पारसडे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील आलमारीतील साहित्य अस्ताव्यस्त केले. हा प्रकार लक्षात येताच पारसडे यांचे नातेवाईक विनायक पिसे यांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. तर पिपरी (मेघे) भागातीलच राममुर्ती वैद्य ले-आऊट येथील जनार्दन बरडे यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. तर डॉ. डी.सी. कुमेरीया यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला. पारसडे व बरडे हे घटनेच्यावेळी बाहेरगावी गेले असल्याने व ते सोमवारी सायंकापर्यंत वर्धेत परत न आल्याने यांच्या घरातून चोरट्यांनी किती रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला हे स्पष्ट होऊ शकले नाही. वृत्तलिहिस्तोवर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

महावितरणने पकडले चार वीजचोर
वर्धा : विद्युत चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा धडाका सध्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लावला असून छापा टाकून विद्युत चोरीची चार प्रकरणे महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी उजेडात आणली आहेत. त्यांच्या या धडक कारवाईमुळे विद्युत चोरी करणाºयांचे धाबे दणाणले आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या चमुने वर्धेतील विद्युत चोरीची चार प्रकरणे उजेडात आणली आहे. सदर चोरट्यांकडून १ लाखापेक्षा अधिक देयकाची रक्कम आणि तडजोड शुल्क वसूल करण्यासाठी पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे. यापूर्वी महावितरणच्या अधिकाºयांनी मागील आठवड्यात विद्युत चोरी करणाºया दोघांवर कारवाई केली होती. महावितरणच्या वर्धा विभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या नेतृत्वात विद्युत चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी केजाजीनगर, गोंड मोहल्ला, पूलफैल या भागात विद्युत मिटर तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तपासणीदरम्यान तीन विद्युत ग्राहकांनी थेट वायर टाकून विद्युत घेतल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या चोरट्यांनी ५ हजार १२६ युनिट विद्युत चोरी केल्याचे पुढे आल्याने त्यांना आठ हजार रुपये भरण्याचे व चार हजार रुपये तडजोड शुल्क असे एकूण १२ हजार रुपयांचे देयक देण्यात आले आहे. केजाजीनगरातील दोन ग्राहकांनी १० हजार ९७ युनिटची विद्युत चोरी केल्याने त्यांना तडजोड शुल्कासह एकूण ६४ हजार १८० रुपयांचे देयक देण्यात आले. तर अन्य एका प्रकरणात घरगुती वीज ग्राहकाने व्यवसायिक कारणासाठी विद्युतचा वापर केल्याचे निदर्शनास आल्याने त्याला तडजोड शुल्कासह ४० हजार ५५० रुपयांचे देयक देण्यात आले आहे.

Web Title: Three houses scattered by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.